आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio फोन कधी मिळेल याबाबत सस्पेन्स, समोर आले हे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिलायन्स जिओच्या 4G फोनची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. या फोनच्या लाँचिंगवेळी मुकेश अंबानी म्हणाले होते की, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हा फोन ग्राहकांच्या हातात दिसायला सुरवात होईल. मात्र, हा फोन सप्टेंबरमध्ये ग्राहकांना मिळण्याची शक्यता धुसर आहे. 
दिव्य मराठी वेब टीमने जिओला दहा प्रश्न विचारले होते. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे फोनच्या डिलीव्हरीला इतका उशीर का होतोय? हा फोन ग्राहकांच्या हाती कधी दिसेल? मात्र, या प्रश्नांचे उत्तर देण्यास कंपनी अपयशी ठरली. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, सध्या यासंदर्भात कंपनीही संभ्रमात आहे. दुसरीकडे हा फोन बुक करणाऱ्यांचे 500 रुपये कंपनीकडे अडकून पडले आहेत. 1500 रुपयांच्या या फोनचे उर्वरीत 1000 रुपये फोन मिळाल्यानंतर द्यावयाचे आहेत. 
 
फोनचे स्टेटस कळनेही झाले अवघड
 
कंपनीने सांगितले होते की, बुकींग केल्यानंतर या फोनचे स्टेटस ग्राहक ऑनलाईन अथवा ऑफलाईन तपासू शकतील. मात्र, अजूनसुद्ध या फोनचे स्टेटस कळनेही अवघड होऊन बसले आहे. बुकींग करतांना कंपनीने ऑर्डर क्रमांक आणि ट्रान्झॅक्शन आयडी दिलेला आहे. हे दोन्ही क्रमांक टाकून तुम्हाला तुमच्या मोबाईलचे स्टेटस कळणार होते. मात्र, आता हे दोन्ही क्रमांक टाकले असता इनव्हॅलिड असल्याचे सांगितले जात आहे.
 
फोनवरून लवकरच रिप्लाय करू
 
टोल फ्री क्रमांकावरूनदेखील फोनचे स्टेटस कळले नाही. कंपनीने 18008908900  हा टोल फ्री क्रमांक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला होता. याठिकाणी फोन केल्यावर कस्टमर सर्व्हिस कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही यासंदर्भात लवकरच कळवू. मात्र, सध्या ग्राहक या फोनची आतुरतेने वाट पाहत असल्याचे बघायला मिळतेय.
 
पुढील स्लाईडवर वाचा - अंबानीचे हे म्हणणे ठरले खोटे
 
बातम्या आणखी आहेत...