आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12वी पास आहात का? ONGCमध्ये तुम्हाला आहे सरकारी नोकरीची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही फक्त 12 वी पास असाल तर ओएनजीसी या देशातील सरकारी आणि नामांकित कंपनीत नोकरीची संधी आहे. ऑईल आणि नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये अॅप्रेंटिस पोस्टसाठी अकाऊंटंट, केबिन, रुम अॅटेंडंट, ड्राफ्ट्समन आणि इलेक्ट्रीशियन ट्रेडसाठी मोठ्या संधी आहेत. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात युवकांची आवश्यकता आहे. कंपनीने यासाठी अधिकृतपणे जाहिरात देऊन अर्ज मागविले आहेत. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्यांना ओएनजीसीमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2017 आहे. कंपनीने यासंदर्भात अधिक माहिती दिलेली आहे.
 
एकूण जागा - 782 
 
शैक्षणिक अहर्ता
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
 
वयोमर्यादा
या जागांसाठी अर्ज करण्यासाठी किमान 18 आणि कमाल 24 वर्षे वयोमर्यादा ठरविण्यात आलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...