Home »Business »Business Special» Kanika Beat Cancer And Established 70 Cr Worth Company

26 व्या वर्षी कॅन्सरला हरवून सुरु केला बिझनेस, तरुणीने उभी केली 70 कोटींची कंपनी

दिव्य मराठी वेब टीम | Sep 27, 2017, 11:51 AM IST

नवी दिल्ली -स्पर्धेच्या युगात लहानसहान कारणावरून तरुण मानसिकदृष्ट्या खचून जातात. मात्र, कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून आयुष्याला एक वेगळे वळण देण्याच्या हिंमतीला सलाम करायला हवा. होय, ही तरुणी म्हणजे जेटसेटगो ची सीईओ कनिका टेकरीवाल. या तरुणीने कॅन्सरला हरवून आपल्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. एव्हिएशन सेक्टरमध्ये सुरु केलेल्या या बिझनेसचा तब्बल 70 कोटी रुपये टर्नओव्हर आहे. सध्या हा बिझनेस यशस्वीरित्या सांभाळतेय.
दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना कनिकाने सांगितले, की लहानपणापासून आकाशामध्ये उड्डाण घेण्याचे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी 17व्या वर्षी करिअरची सुरवात एव्हिएशन सेक्टरमध्ये नोकरीपासून केली. यादरम्यान एमबीएच्या डिग्रीसाठी लंडन गाठले. यादरम्यान कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यामुळे लंडनहून परतावे लागले. तब्बल एक वर्षापर्यंत कर्करोगावर उपचार केले. त्यातून पूर्णत: बरी झाले. कर्करोगाला हरविल्यानंतर जेटसेटगोचा बिझनेस सुरु केला.
पुढील स्लाईडवर वाचा - कनिकाने कसा सुरु केला व्यवसाय

Next Article

Recommended