आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या फोन नंबरला आधार कार्डसोबत करा लिंक, नाही तर फेब्रुवारीत सिम होणार बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्कः केंद्र सरकारने आता मोबाइल नंबरला आधारसोबत लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डसोबत लिंक न केल्यास तुमचं सिम बंद करण्यात येणार आहे. सरकारने यासाठी ठराविक कालावधी निश्चित केला आहे. मोबाइल नंबरला आधार कार्डसोबत लिंक करण्याच्या सोप्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या. 

कंपनीच्या आउटलेटमध्ये करुन घ्या लिंक...
तुम्ही ज्या कंपनीचे ग्राहक आहात, त्या कंपनीच्या आउटलेटमध्ये जाऊन तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डसोबत लिंक करु शकता. सर्व कंपन्यांनी प्रत्येक शहरातील निवडक आउटलेटमध्ये बायोमॅट्रिक डिवाइसची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. हे डिवाइस आधारच्या सर्व्हरसोबत जोडण्यात आले आहे. येथे तुमच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात येईल आणि तुमच्याविषयीची इतर माहिती त्यात भरावी लागेल. स्वतःविषयी माहिती दिल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. ओटीपी नंबर भरल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.  
 
... नाही तर फेब्रुवारी 2018 मध्ये बंद होईल नंबर 
तुमचा मोबाइल क्रमांक आधारसोबत लवकरात लवकर लिंक करुन घ्या. कारण यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2018 पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. मोबाइल नंबरवरुन होणा-या फसवणुकीला आळा घालण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली असून त्यांनी ग्राहकांना याविषयी सूचित करण्यास सांगण्यात आले आहे. कंपन्यांना e-KYC प्रोसेस सुरु करण्याचे आदेश आहेत. पण हे काम तुम्ही स्वतःदेखील करु शकता.  

कंपनीच्या आउटलेटवर लिंक होणार नंबर, संपूर्ण प्रक्रिया बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....  
बातम्या आणखी आहेत...