आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी घरभाडे देण्यापुरतेही नव्हते पैसे, आता हा व्यक्ती कमावतोय वर्षाकाठी 400 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एक काळ असा होतो जेव्हा या व्यक्तीच्या कुटूंबाकडे घरभाडे देण्यापुरतेही पैसे शिल्लक नसायचे. घरभाडे न दिल्यामुळे घरमालकाने या व्यक्तीला घराबाहेर काढून दिले होते. त्यामुळे रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली होती. काही काळानंतर एक खोली असलेल्या घरात हे कुटूंब राहायला गेले. या कुटूंबाची इतकी वाईट दशा झाली होती की थोड्याबहुत कमाईसाठी किरकोळ चोरीही करावी लागली. त्यामुळे तुरुंगाचीही हवा खावी लागली. बऱ्याच ठिकाणी नशीब वापरून पाहिले, पण निरुपयोग झाला. 
 
मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा या व्यक्तीचा वाईट वेळ निघून गेला. आता या व्यक्तीचा समावेश जगातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये झाला आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्याने एका वर्षात तब्ब्ल 420 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा व्यक्ती म्हणजे जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा, अभिनेता आणि बिझनेसमन जो द रॉक नावाने ओळखला जातो. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - द रॉकचे बालपण
बातम्या आणखी आहेत...