आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधारशी लिंक होईल ड्रायव्हिंग लायसन्स, चुकी झाल्यास थेट बँक खात्यातून कापला जाईल दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँक अकाऊंट, पेन आणि मोबाईल क्रमांकानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधार कार्डशी लिंक करण्याच्या विचारात सध्या सरकार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात चाचपणी सुरु केलेली आहे. याचा मुख्य हेतू म्हणजे नकली लायसन्सवर रोख लावण्याचा असेल. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, केंद्र सरकार याबाबत गंभीरतेने विचार करीत आहे. या संदर्भात वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. यावर निर्णय झाल्यास एका वर्षात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
 
- रविशंकर प्रसाद हरियाणा येथील डिजीटल समिटमध्ये बोलत होते. 
- ते म्हणाले, की जर एखाद्या व्यक्तीचे चालान कापण्यात आले. पण त्याने दंडाची रक्कम भरली नसल्यास त्याची सूचना ट्रान्सपोर्ट विभागाकडे जाईल. 
 
हे दोन प्रमुख पाऊल उचलले जातील
- ज्याठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत अशा मार्गावर याचा फायदा होईल. त्यामुळे सीसीटीव्हीद्वारे थेट फोटो काढून पुराव्यानिशी दंडाची रक्कम वसूल केली जाईल. 
- सदरील महामार्गावर सीसीटीव्ही नसल्यास त्याठिकाणी कार्यरत असलेला वाहतूक कर्मचारी कॅमेऱ्यात फोटो काढून चालानसोबत पाठविणार आहे. 
बँकेतून असा कापला जाईल दंड
- बँकेतून पैसे कापण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर एक मॅसेज पाठविण्यात येईल. 
- जर त्या व्यक्तीला याबाबत आक्षेप घ्यायचा असेल, तर तो वेबसाईट अथवा मदत क्रमांकवर फोन करून दाद मागू शकेल.
- त्याच्या बँकेकडेसुद्धा यासंदर्भात नोटिफीकेशन पाठविले जाईल.
- त्यानंतरच त्याच्या खात्यातून पैसे कापले जातील.
आधार लिंक असल्याचे हे होतील फायदे
- वाहतूक संदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर आळा बसेल. त्याचबरोबर त्याच्याकडून ताबडतोब दंड वूसल करता येईल.
- दुसऱ्याच्या नावावर लायसन्स बनविता येणार नाही.
- अपघात झाल्यास त्या व्यक्तीची ओळख तातडीने करणे सोपे होईल.
- मेडिकल इन्शुरन्स असल्यास त्याचा फायदा तत्काळ घेता येईल.
18 कोटी लायसन्स, 1.12 अब्ज आधार
- देशात सध्या 18 कोटी नागरिकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. त्याशिवाय 1.12 अब्ज लोकांकडे आधार कार्ड आहे. आधार कार्डचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 88.2 टक्के इतके आहे.
- देशामध्ये एकूण कारची संख्या 2.25 कोटी इतकी आहे. याचाच अर्थ 1000 व्यक्तींच्या मागे 18 कार आहेत. देशात 16 कोटींपेक्षा जास्त टू व्हीलर आहेत. दिवसाकाठी सरासरी 54 हजार वाहनांचे रजिस्ट्रेशन होते.
बातम्या आणखी आहेत...