आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ऑनलाईन साईटवर बुक करा मुव्ही तिकीट, व्हाट्सअॅपवर मिळेल कन्फर्मेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सध्या जिकडे तिकडे ऑनलाईनचा बोलबाला आहे. ऑनलाईवर बुकींग केल्यावर भरघोस डिस्काऊंटही ग्राहकांना मिळतोय. त्याचबरोबर ऑनलाईन बुकींग ग्राहकांच्याही सोयीची असते. आतापर्यंत मोबाईलवर मॅसेजने कोणत्याही बुकींगचे कन्फर्मेशन मिळायचे. मात्र, ऑनलाईन चित्रपट बुकींग करणाऱ्या बुक माय शो या पोर्टलने बुक केलेल्या तिकीटाचे कन्फर्मेशन व्हाट्सअॅपवर देण्यास सुरवात केली आहे. हा प्रयोग करणारा बुक माय शो हा पहिला प्लॅटफॉर्म असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
 
बुक माय शोचे रणदीप चावला म्हणाले, की व्हाट्सअॅप दैनंदिन जगण्यातील प्रमुख घटक झाला आहे. त्यामुळे यापुढे व्हाट्सअॅपवर आम्ही तिकीटाचे कन्फर्मेशन देणार आहोत. हे फिचर्स अगदी काही दिवसांत सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. व्हाट्सअॅपवर तिकीट कन्फर्मेशनसह क्यूआर कोडही मिळेल. याशिवाय स्वतंत्र ई मेल ही पाठविण्यात येईल.
 
बातम्या आणखी आहेत...