Home »Business »Business Special» Once A Handbag Seller Now Sips In A Bowl Of 21 Million Pounds

एकेकाळी बॅक विकायचा हा 9वी पास व्यक्ती, आज 248 कोटींच्या बशीत पितो चहा

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 11:31 AM IST

नवी दिल्ली -इच्छाशक्ती मजबूत असेल तर जगातील कुठलेही काम अशक्य नसते. ठरविलेल्या कामात तुम्ही स्वत:ला किती झोकून देता यावर ते यश आणि अपयश अवलंबून असते. हे सिद्ध केले आहे चीनच्या लियू यिकियान या व्यक्तीने. एकेकाळी लियूची परिस्थिती इतकी वाईट होती की दररोजच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना टॅक्सी चालवावी लागे. आज त्यांनी इतके पैसे कमावले की तब्बल 248 कोटी रुपयांच्या कटोरीमध्ये ते चहा पितात. ही कटोरी त्यांनी एका लिलावात खरेदी केली होती.
1.3 अब्ज डॉलर आहे संपत्ती
फोर्ब्सनुसार, लियूकडे एकूण 1.3 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. ते सनलाईन ग्रुपचे चेअरमन आहेत. या कंपनीच्या माध्यमातून ते केमिकल्स, फार्मास्युटिकल आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस देतात. ते त्यांची पत्नी शओ वेई चीनचे सर्वाधिक यशस्वी आर्ट इन्व्हेस्टर आहेत. लियूचे वय 53 वर्षे असून त्यांनी ही सर्व संपत्ती गुंतवणूकीतून कमावली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा - असे झाले श्रीमंत

Next Article

Recommended