Home »Business »Business Special» Once He Did Work On Rented Computer Now Owner Of Company

एकेकाळी संगणक भाड्याने घेऊन करायचे काम, आज आहेत 1000 कर्मचारी असलेल्या कंपनीचे मालक

औरंगाबाद - आयटी उद्योग म्हटला की डोळ्यासमोर पुणे, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद ही शहरे समोर येतात.

अभिजीत हिरप : दिव्य मराठी वेब टीम | Sep 27, 2017, 17:43 PM IST

  • अमेरिकेतील युनिग्राफिक्सच्या मुख्य कार्यालयाला 2004 मध्ये प्रशांत देशपांडे यांनी भेट दिली.
औरंगाबाद -आयटी उद्योग म्हटला की डोळ्यासमोर पुणे, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद ही शहरे समोर येतात. औरंगाबादसारखी शहरे अजूनही आयटीपासून बरीच दूरवर आहेत. पण, एका ध्येयवेड्या व्यक्तीने 1990 साली गोदरेजसारख्या कंपनीतील व्यवस्थापनातील नोकरी सोडून औरंगाबादमध्ये येऊन आपल्या घरालाच ऑफिस बनवले. याच होम बेस्ड कार्यालयातून नामांकित कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर तयार करून द्यायचे, ते सुद्धा मित्राकडून भाड्याने आणलेल्या कॉम्प्युटरवर. त्यांनी स्वप्न पाहिले, सोबत ध्येयवेडी माणसे पार्टनर म्हणून सोबत घेतली अन् घरातून सुरु झालेला आयटी उद्योगाने 100 कोटींची भरारी घेतली. फक्त कोट्यावधींची उलाढालच नव्हे, तर अमेरिका आणि जर्मनीतही स्वत:च्या कंपन्या उभ्या केल्या. त्याशिवाय हजाराहून अधिक तरुणांना त्यांनी नोकरीही दिली. हे यश मिळविले आहे औरंगाबादेतील एक्सपर्ट ग्लोबल सोल्यूशन ग्रुपचे संचालक प्रशांत देशपांडे यांनी...
असा सुरु झाला एक्सपर्ट ग्लोबलचा प्रवास
'दिव्य मराठी वेब टीम'शी बोलतांना प्रशांत देशपांडे यांनी सांगितले, की अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्युटमध्ये एमएएमएस - ऑपरेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी गोदरेजसह पाच बहुराष्ट्रीय कंपन्यांत विविध व्यवस्थाकीय पदासाठी मुलाखती दिल्या. विशेष म्हणजे पाचही कंपन्यांत त्यांची निवड झाली. मात्र, त्यांनी गोदरेज कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नोकरी स्वीकारली. गोदरेज कंपनीत ते थेट संचालकीय मंडळाशी संपर्क असायचा. त्यांना अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या शिक्षणाचा फायदा झाला. अवघ्या दोन वर्षात 1989 मध्ये गोदरेजची त्या काळातील सर्वोत्तम नोकरी सोडली. त्याऐवजी त्यांनी कमी पगारात मास्टेकमध्ये नोकरी स्वीकारली. मात्र, ही नोकरीसुद्धा सहा महिन्यापर्यंतच केली.
पुढील स्लाईडवर वाचा - गोदरेज कंपनीतील रग्गड पगाराची नोकरी सोडण्याचे कारण...

Next Article

Recommended