आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय रिझर्व्ह बँकेने सहायक पदासाठी अर्ज मागविले आहेत. रिझर्व्ह बँकेने 623 सहायक पदासाठी अर्ज मागविले असून त्यासाठी 10 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा लागेल. नेमणूक झालेल्या उमेदवारांना रिझर्व्ह बँकेच्या विविध कार्यालयात काम करण्याची संधी मिळणार आहे. हा अर्ज रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आहे.

एकूण जागा - 623
 
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण. त्यासह अधिकृत संस्थेतून संगणकाचे प्रशिक्षण घेतलेले असावे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 20, कमाल वय 28 वर्षे असावे.
निवड प्रक्रिया : पूर्वपरिक्षा, मुख्य परिक्षा आणि भाषेची चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना निवडण्यात येईल.
पे स्केल : रु. 13,500-34,900
 
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर
पूर्व परिक्षा - 27 आणि 28 नोव्हेंबर 
मुख्य परिक्षा - 20 डिसेंबर
अधिक माहितीसाठी https://rbi.org.in/scripts/Bs_viewcontent.aspx?Id=3413 या लिंकवर क्लिक करा. 
बातम्या आणखी आहेत...