आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 23व्या वर्षी आहे 6000 कोटींचा मालक, एकेकाळी रस्त्यावर विकायचा सिमकार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आज Oyo Rooms या कंपनीचे यश पाहून भलेभले उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार चकित झाले आहेत. ही ओयो कंपनी पर्यटकांना स्वस्तात मस्त राहण्याची सुविधा देशातील मोठ्या शहरांत उपलब्ध करून देते. या कंपनीची सुरवात 17 वर्षाच्या एका तरुणाने केली होती. आज या कंपनीची उलाढाल 6000 कोटी रुपये झाली आहे. त्याशिवाय यामार्फत होणऱ्या बुकींमध्ये प्रत्येक तिमाहीत तब्बल 30 टक्क्यांची वाढ होत आहे. नुकतेच ओयो रुम्स या कंपनीत जापानच्या सॉफ्ट बँकेने 25 मिलीयन डॉलरची गुंतवणूक केली. सॉफ्टबँकेने  भारतात फ्लिपकार्टनंतर सर्वाधिक गुंतवणूक ओयो कंपनीत केली आहे. एकेकाळी घरभाड्याचे पैसे देण्यासाठी नव्हते.
 
- या कंपनीचे फाऊंडर आहेत रितेश अग्रवाल. ज्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी इंजिनीअरींगचे शिक्षण सोडून या कंपनीची सुरवात केली होती. 
- या कंपनीची सुरवात रितेश अग्रवाल यांनी कोणाच्याही मदतीशिवाय केली होती. आता अवघ्या सहा वर्षात या कंपनीची उलाढाल 6000 कोटी रुपये आहे. 
- एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, एकेकाळी माझ्याकडे घरभाडे देण्याइतपतही पैसे नसायचे. कित्येक रात्र मी कुठेही झोपायचो. मीडिया अहवालानुसार त्यांनी एकेकाळी रस्त्यावर उभे राहून सिमकार्डचीही विक्री केली होती. 
- रितेश यांनी एक वेबसाईट तयार केली होती. याठिकाणी ते स्वस्त आणि सोयीसुविधां युक्त हॉटेल्स संदर्भात माहिती पुरवायचे. या वेबसाईटचे नाव होते ओरावल. 
- एका माहितीनुसार, रितेश यांना वाटले की ओरावल हे नाव लोकांच्या पचनी पडत नाही. तेव्हा त्यांनी 2013 मध्ये वेबसाईटचे नाव बदलून ओयो असे केले. 
 
अशी सुचली कल्पना 
- 2009 साली रितेश देहरादून आणि मसूरी येथे फिरायला गेले होते. त्याठिकाणी त्यांना ही आयडिया सुचली. 
- त्यांनी ऑनलाईन सोशल कम्युनिटी सुरु करण्याचा विचार केला. याठिकाणी प्रॉपर्टी मालक, सर्व्हिस प्रोव्हायडर यांना एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे ठरविले. 
- त्यानंतर 2011 मध्ये रितेश अग्रवाल यांनी ओरावेलची सुरवात केली. या संकल्पनेसाठी गुडगाव येथील मनीष सिन्हा यांनी ओरावेल कंपनीत गुंतवणूक केली.
- त्यानंतर 2012 साली कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत झाली. याीदरम्यान स्टार्ट अप एक्सलरेट व्हेंचर नर्सली एंजने त्यांची मदत केली.
- आज संपूर्ण देशभरात 8500 हॉटेल्समध्ये 70,000 हून अधिक रुम्स आहेत.
2 दिवस केले कॉलेजचे शिक्षण
- रितेश यांचा जन्म ओडिसा येथील बिस्सम गावात झाला. रायगडा येथील सिक्रेट हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले.
- ते सुरवातीपासून बिल गेटस, स्टीव जॉब्स आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यापासून प्रेरणा घ्यायचे. वेदांता कंपनीचे मालक अनिल अग्रवाल हे त्यांचे आदर्श होते.
- रितेश शालेय शिक्षणानंतर आयआयटीमध्ये इंजिनीअरींगचे शिक्षण घेऊ इच्छित होते. मात्र, अॅडमिशन घेण्यास ते अयशस्वी ठरले.
- त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये अॅडमिशन घेतले. दिल्ली येथील कॅम्पसमध्ये ते केवळ दोन दिवस गेले.
 
अनेक अडचणींचा होता डोंगर
- फंडिंग, मार्केटिंग आणि प्रॉपर्टी ओनर्सपर्यंत पोचण्यासाठी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आल्या.
- मात्र, टीम वर्क आणि योग्य मार्गदर्शनामुळै त्यांनी कंपनीला यशस्वीरित्या उभे केले.
- ओयो रुम्स ने सॉफ्टबँकेसह अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले. 
- कंपनी या फंडचा वापर भारत आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये विस्तार करण्यासाठी करणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...