मुंबई - पेटीएम ईकॉमर्स प्रा. लि. यांच्या मालकीच्या पेटीम मॉलने 20 ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्सवाच्या पहिल्या हंगामात चार दिवसांचा‘मेरा कॅशबॅक सेल’ जाहीर केला आहे. कंपनी ग्राहकांना 501 कोटी रुपयांचा निश्चित कॅशबॅक देणार आहे कारण कंपनी ब्रँड-अधिकृत स्टोअर, मोठे रिटेल चेन आणि लहान दुकानदार यांच्यासोबत एकत्रितपणे अबाधित किमतींवर उत्पादने मोठ्या प्रमाणात होस्ट करण्यासाठी कार्य करत आहे.
यादरम्यान भेटवस्तू, उपकरणे, मोबाईल आणि फॅशन, कपडे, पादत्राणे आणि सामान यांच्या खरेदीवर 15% ते 100% कॅशबॅक मिळेल. याव्यतिरिक्त, दररोज 25 फोन खरेदीदारांना 100% कॅशबॅक देणार आहे आणि 200 ग्राहकांना प्रत्येक दिवशी 100 ग्राम पेटीएम गोल्ड प्राप्त होईल, ज्यामुळे विक्रीसाठी पैशाचे सर्वाधिक मूल्य मिळेल.
पुढील स्लाईडवर वाचा - असा आहे 'मेरा कॅशबॅक सेल'