आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या रंगात येणार रॉयल एनफिल्ड Classic, सुरु होणार बुकींग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रॉयल एनफिल्डने सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या क्लासिक 350 आणि क्लासिक 500 बाईक्सला दोन नव्या रंगात सादर केले आहे. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मध्ये गनमेटल ग्रे, तर क्लासिक 500 मध्ये स्टिल्थ ब्लॅक शेड रंगाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरवातीला नवे दोन अपडेटेड मॉडेल बाजारात येण्याची शक्यता होती. मात्र, रॉयल एनफिल्ड नव्या दोन रंगात बाजारात आली आहे. या दोन्ही बाईकमध्ये रिअर डिस्क ब्रेक उपलब्ध आहे.
 
या महिन्यात होईल बुकींगला सुरवात
 
नवी क्लासिक 350 आणि क्लासिक 500 साठी 18 सप्टेंबर 2018 पासून बुकींगला सुरवात होणार आहे. क्लासिक 350 गनमेटल ग्रे रंगातील बाईक चेन्नईमध्ये 1 लाख 59 हजारात ऑन रोड उपलब्ध होईल्. तर क्लासिक 500 स्टिल्थ ब्लॅक शेडमधील बाईक 2 लाख 5 हजारांत मिळणार आहे.
 
कंपनीने हे सांगितले
 
या दोन्ही नव्या रंगातील बाईक सादर करतांना कंपनीचे अध्यक्ष रुद्रतेज सिंह म्हणाले, की आम्ही आमची विश्वसनीयता बाजारात कायम ठेवू इच्छित आहोत. त्यासाठी दोन रंगात आम्ही रॉयल एनफिल्ड क्लासिक बाजारात आणल्या. 
बातम्या आणखी आहेत...