आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच रस्त्यावर धावणार मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारकडून 2030 पूर्वी देशभरात इलेक्ट्रॉनिक वाहने रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सर्व ऑटोमोबाईल उद्योगाने तयारी सुरु केली आहे. कार उत्पादनातील अग्रगण्य कंपनी मारुती सुझुकीसुद्धा यात मागे राहणार नाही. मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. कलसी दिव्य मराठी वेब टीमला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना म्हणाले की, लवकरच मारुतीची इलेक्ट्रिक कार रस्त्यावर धावणार... यासाठी कंपनी पूर्णत: तयार आहे. 
 
प्रश्न - सरकार 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहने सादर करू इच्छित आहे. यासाठी मारुती सुझुकी कितपत तयार आहे?
उत्तर - मारुती सुझुकी इलेक्ट्रिक वाहने सादर करण्यास सज्ज आहे. यासाठी आर अँड डी पातळीवर काम सुरु झालेले आहे. सध्या आमच्याकडे यासाठी बराच वेळ आहे. आम्ही नव्या टेक्नॉलॉजीवर काम करीत आहोत. सध्या बाजारात आमचे एक इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध आहे.
 
प्रश्न - भारतात मारुतीची इलेक्ट्रिकल कार कधी सादर होईल?
उत्तर - यावर आम्ही आता बोलू शकत नाही.
 
प्रश्न - भारत इलेक्ट्रिक वाहनांसाठी सज्ज आहे?
उत्तर - भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुसज्ज पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. यासाठी मोठ्या प्रमाणात चार्जिंग सेंटर सुरु करावे लागतील. भारतात इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावर धावण्यासाठी मोठे आव्हाने आहेत. याव्यतरिक्त सरकारकडून स्पष्ट धोरणाचीही आवश्यकता आहे. याशिवाय भारतात इलेक्ट्रिक वाहन चालविणे कठीण काम आहे.
 
प्रश्न - जीएसटीमुळे सेस वाढला, त्याचा किती परिणाम व्यवसायावर होईल?
उत्तर - सेस मध्ये 10 टक्क्यांची वाढ झाल्याने विक्रीवर निश्चीत परिणाम होईल. भारतातील बाजारपेठ किंमतीबद्दल संवेदनशील समजले जाते. सध्या आम्ही कारच्या किंमतीत वाढ केलेली नाही.
 
प्रश्न - या आर्थिक वर्षात किती टक्के विक्रीत वाढ अपेक्षीत आहे?
उत्तर - विक्रीमध्ये वाढ होण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. या आर्थिक वर्षात आम्हाला डबल डिजीट वाढ अपेक्षीत आहे. ग्रामीण भागात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मॉन्सू्न चांगला असल्याने वाढीचे टार्गेट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 
बातम्या आणखी आहेत...