Home »Business »Business Special» Self Taught Designer Janessa Leone Pulled 20 Crore Out Of A Hat

पॅरिसमध्ये सुचली बिझनेस आयडिया, त्यानंतर करोडपती झाली लिओनी

दिव्य मराठी वेब टीम | Oct 07, 2017, 10:45 AM IST

नवी दिल्ली -बिझनेसची आयडिया कधी, कुठे आणि केव्हा मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. एखाद्यावेळी तुम्ही फिरायला गेल्यासही तुम्हाला बिझनेस आयडिया सुचू शकतात. एक तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना पॅरिसला फिरायला गेली. अन् तिला त्याठिकाणी बिझनेस आयडिया सुचली. या बिझनेस आयडियाच्या अंमलबजावणीनंतर ती काही वर्षातच करोडपती झाली.
पॅरिसने बदलले लिओनीचे आयुष्य
2009मध्ये सॅन डिआगो विद्यापीठातून इंग्रजी लिटरेचरमध्ये पदवी संपादन केल्यानंतर जेनेसा लिओनीला नोकरी मिळाली. नोकरी करीत असतांना लिओनीने लॉमध्ये प्रवेश घेतला. यादरम्यान लिओनीला पॅरिसला जाण्याची संधी मिळाली. तेथे तिला एक बिझनेस आयडिया सुचली अन् आता तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
ही सुचली बिझनेस आयडिया
पॅरिसला फिरायला गेल्यानंतर 30 वर्षीय लिओनीला एक बिझनेस आयडिया सुचली. लिओनीला त्याठिकाणी 1940 मध्ये तयार करण्यात आलेली टोपी खूप आवडली. तिने ही टोपी 10 यूरो इतकी रक्कम मोजून खरेदी केली. लिओनीला ती टोपी इतकी आवडली की तिने स्वत:च्या डिझाईनच्या टोप्या तयार करण्याचे काम सुरु केले. काही वर्षातच तिचा हा टोप्यांचा बिझनेस 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
पुढील स्लाईडवर वाचा - कर्ज न घेता सुरु केला बिझनेस

Next Article

Recommended