आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या एका वर्षात या तरुणीने उभारली 30 कोटींची कंपनी, जाहिरात क्षेत्रात निर्माण केली नवी ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्यात मुलीही मागे नाहीत. या यादीमध्ये आता सुप्रिया साबू या एका नावाची भर पडलीय. सुप्रियाने जेव्हा स्वत:चा बिझनेस निर्माण करण्याचे ठरवले. तेव्हा तिच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले होते. सुप्रियाने कुटूंबियांना सांगितले होते की, एक वर्षात ती स्वत:ला सिद्ध करेल, अथवा तुम्ही सांगाल तेव्हा लग्न करायला तयार आहे. सुप्रियाने आपल्या वडिलांचे हे आव्हान स्वीकारत फक्त 5 हजार रुपयांच्या गुंतवणूकीतून जाहिरात कंपनी सुरु केली. आज मास्टर स्ट्रोक प्रायव्हेट लिमीटेडची या तिच्या मालकीच्या कंपनीची उलाढाल 30 कोटी रुपयांची आहे. 
 
दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना सुप्रियाने सांगितले की, 2009 साली जाहिरात क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्यावेळी या व्यवसायात मोठी आव्हाने होती. सुरवातील हा व्यवसाय समजून घेतांना मोठ्या अडचणी आल्या. मात्र, तिने या अनंत अडचणींशी सामना करून आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरु ठेवली. सुप्रियाने जमा केलेल्या बचतीच्या 5000 रुपयांपासून या व्यवसायाला सुरवात केली.
 
पुढील स्लाईडवर वाचा - सुप्रिया साबूने कसे मिळविले जाहिरात क्षेत्रात यश
 
बातम्या आणखी आहेत...