Home »Business »Business Special» She Started Her Career Selling Jewellery Door To Door Become Chairman

या महिलेने घरोघरी जाऊन विकली बेंटेक्स ज्वेलरी, आज आहे पतसंस्थेच्या चेअरमन

दिव्य मराठी वेब टीम | Oct 13, 2017, 11:43 AM IST

औरंगाबाद -तसा महिलाच्या वाट्याला संघर्ष हा अटळ असतोच आपल्या आजुबाजूला आई-बहिणीकडे पाहीले तरी ते सहज लक्षात येते त्यातून शिकलेली अशिक्षित, गरीब श्रीमंत कोणत्याच महिलेची संघर्षातून सुटका नाही त्यात ती महिला ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील असेल तर मग विचारायलाच नको. मात्र एक आहे अशा अपयश, संघर्ष व बोचऱ्या अनुभवातून त्या खूप काही शिकतात. संघर्ष हे त्यांचे जीवनगाणेच होऊन जाते आणि हे त्यांचे शिकण आणि त्यातून मिळणार धवल यश त्यांना कुठल्याही यशोशिखरापर्यंत नेत आणि हेच नेमके घडले आहे मनीषा मुंडे यांच्याबाबतीत.
जगण्याचा संघर्ष करतांना घर-गृहस्थी सांभाळून गावोगाव फिरुन बचतगट स्थापन करत आपल्या उदरनिर्वाहासाठी लहान बा‌ळाला घेऊन ग्रामीण भागातील गावोगावी फिरुन त्यांनी बेंटेक्सची ज्वेलरी विकली आणि बचतगटही बांधले. आई कडून मिळालेली प्रेरणा आणि कष्ट, संघर्षाच्या बाळकडूने त्यांना कधीही खचू दिल नाही नैराश्य येऊ दिल नाही. तर उलट त्यांच्या स्वार्थ नसलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना महिला व ग्रामस्थांनीही तेव्हढीच दमदार साथ दिली आणि अखेर आज 10 वर्षाच्या कड्या मेहनतीनंतर मनीषाताई झाल्या माय माऊली महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या चेअरमन. काय आहे त्यांची एखाद्या कथेला शोभेल अशी वास्तव कहाणी. वाचा त्यांच्याच अनुभवातून.....
पुढील स्लाईडवर वाचा -उदघाटनापूर्वीच 1600 सभासद, 20 लोकांना दिले कर्ज

Next Article

Recommended