Home »Business »Business Special» She Win The Women Talent Beauty Competition In Washington

या महाराष्ट्र कन्येने जिंकली वॉशिंग्टनची मानाची सौंदर्य स्पर्धा, आता करतेय मिस इंडिया - युएसची तयारी

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 11:17 AM IST

औरंगाबाद -नोकरी किंवा व्यवसायात मग्न असतांना आपल्या आवडी जोपासणाऱ्यांची संख्या अत्यंत दुर्मिळ आहे. सातत्याने वेळेचे कारण सांगून आपल्या इच्छा, अपेक्षा आणि महत्त्वकांक्षांना मुरड घातली जाते. मात्र, अमेरिकेच्या डिलाईट या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत असतांनाही या तरुणीने तेथील स्पर्धेत सहभाग घेतला. पूर्वतयारी नसतांनासुद्धा इच्छाशक्तीच्या जोरावर या स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. आता ही तरुणी मिस इंडिया - युएस या स्पर्धेयासाठी पात्र ठरली आहे. होय, ही तरुणी आहे महाराष्ट्राची कन्या. मूळ अमरावती जिल्ह्यातील असलेली चैताली झाडे-चौधरी ही औरंगाबादची सूनही आहे. हे विशेष.
दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना चैताली झाडे-चौधरी म्हणाली की, माझा जन्म अकोला जिल्ह्यातील अकोट या गावातील. संपूर्ण शिक्षण माझे अमरावतीत झाले. त्यानंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पुण्याच्या विश्वकर्मा महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभियांत्रिकीच्या अंतीम सत्रात मला डिलाईट कंपनीने सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून हैदराबादला काम करण्याची संधी दिली. याच कंपनीने मला अमेरिकेत काम करण्याची ऑफर दिली. ही ऑफर स्वीकारून मी डिसेंबर 2015ला अमेरिकेत स्थायिक झाले.
पुढील स्लाईडवर वाचा - विदर्भ माहेर, तर मराठवाडा सासर

Next Article

Recommended