आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेला नाव सुचवा अन् दहा हजार मिळवा, सहभागी होण्यासाठी ही आहे शेवटची तारीख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारच्या बहुतांश योजनांना राजकीय व्यक्ती अथवा महापुरुषांची नावे असतात. तुम्ही सुचविलेले नाव एखाद्या योजनेला मिळू शकते. या नावावरून तुम्हालाही प्रसिद्धी मिळू शकते. मात्र, तुम्ही सुचविलेले नाव सरकारच्या पसंतीस उरतणे आवश्यक आहे. त्या मोबदल्यात तुम्हाला तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत बक्षीसही मिळेल.
 
डिपार्टमेंट ऑफ पोस्टने एका नव्या प्रोजेक्टची सुरवात केली आहे. या अंतर्गत त्यांनी प्रोजेक्टसाठी लोकांकडून नावे मागविली आहेत. डिपार्टमेंटला नाव आवडल्यास नाव सुचविलेल्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.
 
असा असेल प्रोजेक्ट
डिपार्टमेंट ऑफ पोस्टचे उद्दिष्ट पोस्टमास्टरला आयसीटी डिव्हाईस देणे हा आहे. या डिव्हाईसच्या मदतीने पोस्टातर्फे ग्रामीण भागात वितरीत केल्या जाणाऱ्या सेवेत सुधारणा होणार आहेत. याअंतर्गत देशातील 1 लाख 30 हजार पोस्ट कार्यालयाला ठराविक उद्दिष्ट दिले जाईल. 
 
असा करा अर्ज
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.mygov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर क्रिएटिव्ह कॉर्नर या सेक्शवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या मनातील नाव सबमिट करावे लागेल. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - हे आहेत नियम व अटी
बातम्या आणखी आहेत...