आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शंभर फूटाच्या दुकानात सुरु केला टेलरिंग व्यवसाय, आज गारमेंट उद्योगात करताहेत कोटींची उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - टेलरिंग व्यवसायाकडे घर सांभाळून महिलेने करावयाचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. लेडीज टेलर म्हणून शक्यतो आजही महिलाच करतात किंवा महिलांनाच या व्यवसायात प्राधान्य आहे. मात्र, दिवंगत मधुकर कुलकर्णी यांनी 1946 मध्ये औरंगाबादच्या गुलमंडी भागात छोटे दुकान भाड्याने घेऊन सुरु केला लेडीज टेलरचा व्यवसाय. स्वातंत्र्यपूर्वी लेडीज टेलर म्हणून पुरुष हे बऱ्यापैकी अमान्यच होते. तरीसुद्धा त्यांनी यापूर्वी हैदराबादमध्ये एका अमेरिकन फॅशन डिझायनरकडे सहायक म्हणून काम केले होते.
या अनुभवाच्या बळावर त्यांच्याकडे उच्चभ्रु वर्गातील महिलाच त्यांचे कपडे शिवायला याचच्या. हळूहळू सर्वसामान्य महिलांचाही कल मधुकर कुलकर्णी यांच्याकडे वळू लागला. मधुकर टेलर म्हणून ते जुन्या औरंगाबादमध्ये प्रसिद्ध झाले. 1992 पर्यंत हा व्यवसाय घर चालविण्यापुरता मर्यादित होता. त्यानंतर मुलाने व सूनेने मिळून या व्यवसायरुपी रोपट्याचे झाडात रुपांतर केले. अनेक अडचणींवर मात करून हा उद्योग आता चांगलाच बहरू लागलाय.
 
पुढील स्लाईडवर वाचा - मधुकर टेलर ते अंकुर गारमेंटपर्यंतचा हा प्रवास
बातम्या आणखी आहेत...