Home »Business »Business Special» Take Your Bill While You Buying Diwali Products

दिवाळीची खरेदी करतांना करू नका या 5 चुका, पडतील महागात

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 11:31 AM IST

नवी दिल्ली -बऱ्याचवेळा गडबडीमध्ये असंख्य ग्राहक खरेदी केल्यानंतर बिल घेण्यास विसरतात अथवा आवश्यकता नाही, असे समजून घेतही नाहीत. मात्र, थांबा... बिल न घेण्याची चुक यापुढे करू नका. कारण, तुम्हाला तुमचा किंचीतशा हलगर्जीपणाची मोठी किंमत मोजावी लागण्याची नाकारता येत नाही. देशात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार तुम्ही खरेदीचे बिल घेतले असेल, तरच तुम्ही कन्झ्युमर म्हणून ग्राह्य धरले जाल. बिल नसल्यास कायद्यानुसार मिळणाऱ्या अधिकारापासून वंचित रहावे लागले. ग्राहक कायद्यातील अभ्यासक शीतल कपूर यांनी सांगितले की, खरेदीचे बिल घेणे हा तुमचा अधिकार आहे. जर एखादा दुकानदार बिल देत नसेल तर तुम्ही त्याची रीतसर तक्रार करू शकता.
बिल असेल तरच मिळतात या सुविधा
आजकाल एकाच छताखाली अथवा मॉलमध्ये सर्व प्रकारच्या ब्रँडच्या वस्तू मिळतात. मात्र, या वस्तू खराब झाल्यास दुरुस्तीसाठी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला जावे लागते. मात्र, सर्व्हिस सेंटरला गेल्यावर तुमच्याकडे बिल असेल तरच वारंटीमध्ये या वस्तू पैसे न देता दुरुस्त करून मिळतात.
पुढील स्लाईडवर वाचा - बिल न घेतल्याचे हे आहेत 5 तोटे

Next Article

Recommended