Home | Business | Business Special | Things You Need To Know About Pitru Paksha

या 15 दिवसांत श्रद्धेपोटी ठप्प होते बाजारपेठ, हे आहे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2017, 03:09 PM IST

नवी दिल्ली - देशभरात पितृ पक्षाला आता सुरवात झालेली आहे. हिंदु धर्मात पितृ पक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या पक्षाचा

 • Things You Need To Know About Pitru Paksha
  नवी दिल्ली - देशभरात पितृ पक्षाला आता सुरवात झालेली आहे. हिंदु धर्मात पितृ पक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या पक्षाचा संबंध श्रद्धेशी जोडलेला असल्याने यादरम्यान कुठलेही शुभ काम केले जात नाही. यादरम्यान पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध केले जाते. लोकांच्या भावनेशी जोडलेला मुद्दा असल्याने उद्योग क्षेत्रही याकडे दुर्लक्ष करीत नाही.
  पुढील स्लाईडवर वाचा - पितृ पक्षात इंडस्ट्रीमध्ये कसा असतो ट्रेंड

 • Things You Need To Know About Pitru Paksha
  दिव्य मराठी वेब टीमने एक्सपर्टशी चर्चा केली. एक्सपर्टसने दिलेल्या माहितीनुसार दोन आठवड्याचा काळ खूप लहान असतो. त्याचबरोबर पितृ पक्षावर लोकांची नितांत श्रद्धा असते. त्यानंतर लगेचच सणासुदीला सुरवात होते. पितृ पक्षाच्या तारखा अगोदरच माहित असतात. यादरम्यान कंपन्यांत केवळ डिमांड शिफ्ट असते. यामध्ये कंपनीचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. या दोन आठवड्यात कंपन्या फेस्टिवल आणि मॅरेज सीझनसाठी सज्ज होतात. फेस्टिवल सीझननंतर लगेचच लग्नकार्यांना सुरवात होते. या दोन महिन्यात भारतातील बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण असते. 
   
   
 • Things You Need To Know About Pitru Paksha
  सोने चांदीच्या किंमतीवर होतो परिणाम
   
  केडिया कमोडिटीचे अजय केडिया यांनी सांगितले की, दोन आठवड्यादरम्यान कमोडिटी मार्केटवर नकारात्मक परिणाम बघायला मिळतो. सोने-चांदीची मागणी यादरम्यान खूप खालावते. यादरम्यान नवे खाते सुरु करण्यासही तयार नसतात. मात्र, व्यवहार सुरु असतात. हे व्यवहार सणासुदीच्या काळात पूर्ण होतात. 
  अजय यांनी सांगितले की, पितृ पक्षात सोन्याचांदीची मागणी घसरली तरीही त्याचा फारसा परिणाम दरांवर होतांना दिसत नाही. कारण, यानंतर लगेचच दिवाळी, दसऱ्याची चाहूल लागलेली असते. फक्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठात सोन्याचे दर घसरल्यास त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होतो. 
   
  पुढे वाचा - असा असतो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेंड
   
 • Things You Need To Know About Pitru Paksha
  व्ही एम फायनान्शिअलचे रिसर्च हेड विवेक मित्तल म्हणाले की, सप्टेंबर महिना जगभरात स्टॉक मार्केटसाठी उलाढाल नसलेला समजाला जातो. भारतात स्टॉक मार्केट थंडावण्यासाठी मॉन्सून आणि पहिल्या तिमाहीचा निकाल जबाबदार असतो. मात्र, पितृ पक्षाचा फारसा परिणाम स्टॉक मार्केटवर होत नाही. यादरम्यान आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सक्रीय असतात. यादरम्यान नव्या योजनांवर गुंतवणूक करण्याकडे कल नसतो. 
   
  पुढे वाचा - असा असतो कंपन्यांचा कल
   
 • Things You Need To Know About Pitru Paksha
  ऑटो इंडस्ट्री असो अथवा रिअलीटी सेक्टर किंवा कंन्झ्युमर ड्युरेबल्स या साऱ्या कंपन्या नवे उत्पादन लाँच करण्यास धजत नाहीत. साधारणत: दिवाळी, दसरा आणि नवरात्रात नवे उत्पादन लाँच करतात. त्यामुळे पितृ पक्ष संपल्यानंतर डिस्काऊंट ऑफर, सेल घेऊन बाजारात उतरतात.
   
  पुढे वाचा - कसे होतात मोठ्या उद्योजकांचे निर्णय
   
 • Things You Need To Know About Pitru Paksha
  मागील वर्षी पितृ पक्षात टेलिकॉम इंडस्ट्रीने स्पेक्ट्रमचा लिलावात सहभागी होण्यास नकार दिला होता. देशातील मोठी लोकसंख्येची भावना पितृ पक्षाशी निगडीत असल्याने यादरम्यान मोठ्या कंपन्या मोठे निर्णय घेण्याचे टाळतात. 

Trending