Home »Business »Business Special» This Bank Offers Loan Based On Finger Print Scan But Not On Document

जगातील पहिली बँक हातांचे ठसे घेऊन देते कर्ज, कागदपत्रांची नसते आवश्यकता

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 00:14 AM IST

नवी दिल्ली -जगामध्ये अशीही एक बँक आहे जी बँक खातेधारकांकडून कर्ज देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र घेत नाही. मात्र, ही बँक फक्त इमर्जन्सी असल्यावरच कर्ज देते. कर्ज देतांना ही बँक फक्त तुमच्या हाताचे ठसे स्कॅन करून घेते. जापानच्या या अनोख्या बँकेचे नाव आहे ओगाकी क्योरित्सू बँक. या तंत्रज्ञानाचा वापर करून एका व्यक्तीला 11.20 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देते.
तीन वर्षापूर्वी बदलला नियम
2011 मध्ये भूकंप आणि सुनामी दरम्यान जापानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यादरम्यान लोकांनी घर तयार करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. कारण, नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांचे सर्व कागदपत्रे हरवली होती. या त्रासामुळे लोकांना बिझनेस सुरु करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. मात्र, कागदपत्रांअभावी कोणतीही बँक नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देत नव्हती. लोकांना आपली ओळख पटवून देण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे जापानच्या ओगाकी क्योरित्सू बँकेने 2012 पासून कर्ज प्रक्रिया सुलभ केली.
पुढील स्लाईडवर वाचा - बँकेने कोणत्या वर्षी लाँच केली ही स्कीम?

Next Article

Recommended