आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 41 सेकंदात या कारने बनवला हा वर्ल्ड रेकॉर्ड, तुम्हीही व्हाल थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - कारच्या जगामध्ये सर्वाधिक उच्च स्थान बुगाटी या कार कंपनीने निर्माण केले आहे. नवनव्या तंत्रज्ञानामुळे सगळ्या जगाला बुगाटीने आश्चर्याचे धक्के दिलेले आहेत. आता बुगाटीने एका नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तोही फक्त 41 सेकंदात. Bugatti Chiron ने फक्त 41.96 सेकंदात 0 ते 249 एमपीएच म्हणजेच 400.727 किलोमीटर प्रतितास स्पीड घेऊन, पुन्हा शुन्यावर आली. या विश्वविक्रमाची जगातील सर्व ऑटो उद्योगात चर्चा सुरु आहे. या यशामुळे कंपनीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. 
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 8 लिटर इंजिनद्वारे तब्बल 1500 बीएचपी पावर तयार करण्याची क्षमता बुगाटी चिरोन या कारमध्ये आहे. त्यामुळे हायपर कार्सच्या यादीत सर्वात प्रभावी कार ठरलेली आहे. जर्मनीचे टॉप सिक्रेट इहरा - लेसिन टेस्ट ट्रॅकमध्ये माजी फॉर्मुला वन स्टार जुआन पाब्लो मोन्टोया यांनी या कारचा परफॉर्मन्स तपासला. कंपनीतर्फे 500 चिरोन कार तयार करणार आहे. त्यापैकी 300 कारची बुकींग अगोदरच झालेली आहे. या कारची किंमत 17 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 
 
मोन्टोया यांनी 41.96 सेकंदात कारची 400 पेक्षा जास्त वेगाने चालविली, त्याचबरोबर लगेचच थांबविली सुद्धा. यादरम्यान एकूण 1.9 म्हणजेच तीन किलोमीटरपेक्षा किंचीत जास्त रस्ता पार केला. टेस्टनंतर एफ1 रेसरने सांगितले की, ही गाडी आश्चर्यचकितरित्या वेग पकडते. त्याचबरोबर या कारची ब्रेकिंग सिस्टीम दर्जेदार असल्यामुळे लगेचच कार थांबविता येते. या श्रेणीतील ही अत्यंत प्रभावी कार आहे. या कारला सुपर स्पोर्ट कार म्हणता येईल. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - Bugatti Chiron चे टेस्टींग फोटो
बातम्या आणखी आहेत...