औरंगाबाद : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे एक असे अधिकारी आहेत ज्यांची 12 वर्षाच्या काळात 9 वेळा बदली झाली. धक्कादायक म्हणजे त्यांची बदली ज्या शहरात झाली, त्या शहरातील लोकांनी अनुभव केला की त्यांना मुंढे यांच्यासारख्याच अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली होऊनसुद्धा त्यांनी आपली कार्यशैली बदलली नाही, हे विशेष. याच त्यांच्या वैशिष्ट्यामुळे मुंढे जनतेच्या कायम लक्षात राहतात.
25 जुलै 2011ला जालना जिल्ह्यातील बीड-अंबड-जालना मार्गावर तब्बल 5 हजार नागिरकांनी रस्ता रोको केला होता. रस्ता रोकोचे कारण होते, भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांमुळे होणारे मृत्यू. महामार्गावर वाहतूक खोळंबल्याची माहिती मिळताक्षणी सर्व सरकारी अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी तुकाराम मुंढे सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी होते. त्यावेळी त्यांनी संतापलेल्या गर्दीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला. त्यावेळी मुंढेसह एसडीएम आणि एसपीलासुद्धा आंदोलनकत्र्यांनी घेराव घातला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्थ नव्हती. सुरक्षाबळ येण्यासाठी किमान दोन तास लागला असता. पोलिस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही फसला.
ठोस पाऊल न उचलल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊन गर्दीच्या हातून जीव जाण्याचीही शक्यता निर्माण झाली होती. या परिस्थितीत मुंढेंनी स्वत: जबाबदारी उचलून गोळीबार करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर अवघ्या काही क्षणात गर्दी गायब झाली. त्यानंतर काही मंत्री आणि आयजी घटनास्थळी पोहोचले. तुकाराम मुंढे यांनी घटनेचा अहवाल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केला.
पुढील स्लाईडवर वाचा - तुकाराम मुंढेंची कार्यशैली