Home »Business »Business Special» You Can Find Job Near Your Home With Worknby

फक्त 45 सेकंदात घराजवळ शोधा नोकरी, ही कंपनी देत आहे संधी

नवी दिल्ली - तुमच्या घराजवळच तुमचे नोकरीचे ठिकाण असेल, तर क्या बात है. मात्र, ही गोष्ट स्वप्नवत आहे. कारण, नोकरीसाठी हजा

दिव्य मराठी वेब टीम | Sep 19, 2017, 01:00 AM IST

नवी दिल्ली -तुमच्या घराजवळच तुमचे नोकरीचे ठिकाण असेल, तर क्या बात है. मात्र, ही गोष्ट स्वप्नवत आहे. कारण, नोकरीसाठी हजारो किलोमीटरपर्यंत जावे लागते. या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी जयपुर येथील एचआर-टेक स्टार्टअप Worknrbyने अनोखा जॉब सर्च पोर्टल तयार केले आहे. Worknrby चे फाऊंडर आशिष अग्रवाल म्हणले, की बहुतांश लोकांचा नोकरी शोधण्यात बराच वेळ वाया जातो. त्याशिवाय नोकरीनिमीत्त घरापासून दूर जावे लागते. त्यासाठी आम्ही असे पोर्टल तयार केले, ज्यामुळे घराजवळ नोकरी मिळण्याच्या संधी उपलब्ध होतील.
हायपर लोकलवर फोकस
आशिष यांनी सांगितले की, बहुतांश जॉब सर्च कंपन्या मोठ्या शहरांत मोठ्या कंपन्यांसाठी काम करतात. मात्र, हायपर लोकलवर फोकस करून काम करणारे कोणीही नाहीत. त्यामुळे आम्ही स्मॉल सेग्मेंटमधील कंपन्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आम्ही स्किलवर फोकस करून जॉब्स आणि कंपन्यांची यादी तयार करीत आहोत. आमचा उद्देश आहे की, नोकरीसाठी लोकांना घरापासून जास्त दूर जाण्याची आवश्यकता नसेल.
अशी सुचली आयडिया
आशिष यांनी सांगितले की, या पोर्टलमुळे स्थानिक लोकांच्या नोकरी आणि वेळेच्या गरजा पूर्ण होतील. याव्यतरिक्त ट्रान्सपोर्टेशन खर्चही कमी होईल. त्याशिवाय घरापासून नोकरी शोधण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्चातही बचत होईल. त्यामुळे कंपन्या आपल्या व्यवसायात वाढ करू शकतील. सध्या हे पोर्टल दिल्ली, मुंबई, बंगळुरू, जयपुर आणि हैदराबाद येथे सुरु झालेले आहे. कंपनीचे कामकाज 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु केले. अवघ्या 24 तासांत हे अॅप 500 जणांनी डाऊनलोड केले.
पुढील स्लाईडवर वाचा - या पद्धतीने काम करेल हे अॅप्लिकेशन

Next Article

Recommended