आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारासाठी हवे पैसे? काळजी करू नका या बँका देत आहेत मेडिकल लोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आजघडीला गंभीर आजारावरील उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. बहुतांशवेळा या पैशांची व्यवस्था जमीनजुमला, सोने आणि संपत्ती विकून करावी लागते. आता हे विकण्याची आवश्यकता नाही. कारण, या बँका तुम्हाला वैद्यकीय खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून देतील. त्यामुळे घरातील एखाद्या सदस्याच्या वैद्यकीय खर्चासाठी पैशांची आवश्यकता असल्यास तुम्हाला या बँका कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात.
 
यासाठी मिळते मेडिकल लोन
तुम्हाला हॉस्पिटलायझेशन बिल, प्रिस्क्रिप्शन बिलाच्या पेमेंटसाठी मेडिकल लोन वापरू शकता. याव्यतरिक्त अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कीमोथेरपी यांसारख्या उपचारांसाठी मेडिकल लोन वापरू शकता. या कंपन्या आणि बँका 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
 
हप्त्याने भरा पैसे
कंपन्या आणि बँकांनी मेडिकल लोनचे पैसे हप्त्याने अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुमच्यावर अचानक आर्थिक बोजा येणार नाही. मोठ्या कालावधीसाठी तुम्ही लोन घेऊन फेडू शकता. 
 
या कंपन्या देत आहेत मेडिकल लोन
भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व, इंडसइंड बँक, आरोगय फायनान्स आणि एनबीएफसी यांसारख्या कंपन्या मेडिकल लोन उपलब्ध करून देत आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - कोणला घेता येऊ शकते मेडिकल लोन
 
बातम्या आणखी आहेत...