आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीचे व्हा बिझनेस पार्टनर, महिन्याला कमवा 18 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिझनेस सुरु करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला योग्य संधी चालून आली आहे. फक्त बिझनेसच नाही तर लाखो भारतीयांच्या ह्दयावर राज्य करणाऱ्या विराट कोहलीचा बिझनेस पार्टनर होण्याची संधी तुम्हाला आहे. तुम्ही जर मोठ्या शहरात राहत असाल तर तुम्हाला विराट कोहलीच्या बिझनेसमध्ये पार्टनर होऊ शकता.
 
विराट कोहली आपल्या फिटनेस सेंटरचा विस्तार करू इच्छित आहे. त्यामुळे चिशेल ब्रॅँड नावाने संपूर्ण भारतात 100 हून अधिक फिटनेस सेंटर उघडण्याचा मानस कोहलीचा आहे. या सेंटरची शहरांमध्ये फ्रँन्चायजी दिली जाणार आहे. तुम्ही भारताच्या कुठल्याही राज्यात राहत असले तरीही तुम्हाला ही फ्रँन्चायजी घेता येईल. आतापर्यंत कर्नाटक, यूपी, दिल्ली, आंध्रप्रदेश आणि आसाम सारख्या शहरात विराटचे फिटनेस सेंटर सुरु झालेले आहेत. चिशेल ही बंगळुरूची कंपनी असून विराट कोहली या कंपनीचा पार्टनर आहे. तुम्हाला मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, जयपुर, इंदौर गुवाहटी, लखनऊ आणि भोपाळ सारख्या शहरांत या फिटनेसचे सेंटर सुरु करता येणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - विराट कोहलीसह बिझनेस पार्टनर होण्यासाठी काय कराल?
 
बातम्या आणखी आहेत...