आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणकारी \'ईपीएफ\': कर्मचार्‍याच्या निवृत्तीनंतर म्हातारपणाची \'आधार\'काठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड' अर्थात ईपीएफ ही प्रत्येक महिन्याच्या पगारातून होणारी सक्तीची, पण किफायतशीर गुंतवणूक आहे. यामुळेच ईपीएफ योजनेकडे (ईपीएफ) शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची काठी म्हणूनच पाहिले जाते. मूळ वेतनाच्या 12 टक्के दरमहा पगारातील कपात होणारी ही रक्कम 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे निवृत्तीनंतर व्याजासह मिळते, आणि हीच रक्कम आपल्या म्हातारपणाची आधारकाठी म्हणून साथ देत असते.

ईपीएफ सारख्या कल्याणकारी योजनेची प्रत्येक पगारदाराला माहिती असणे गरजेचे आहे. ईपीएफ योजना नेमकी काय आहे. ही योजना कशी चालते आणि भविष्यात आपल्याला किती व कशाप्रकारे लाभ मिळतात, याचा आढावा या लेखातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफ ही खरोखरच पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक कल्याणकारी योजना ठरली आहे. 'एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड अॅण्‍ड मिसलेनिअस प्रोव्हिजन अॅक्‍ट 1952' या कायद्याद्वारे या योजनेवर नियंत्रण ठेवण्यात येते. पहिल्या पगारापासून ते शेवटच्या पगारापर्यंत पीएफची रक्कम कपात होते. मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम पीएफ म्हणून दरमहा कपात होत असते. तितकीच रक्कम संबंधित संस्था, कंपनी (सरकारी अथवा खासगी) आपल्या पीएफ खात्यात जमा करत असते. कपात करण्‍यात आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा होते. ही रक्कम सरकार व्याजासह आपल्याला परत मिळत असते. पीएफमधून मिळणाऱ्या लाभांविषयी माहिती घेण्याआधी या योजनेची माहिती समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, पगारदारासाठी कल्याणकारी ठरलेल्या भविष्य निर्वाह निधी योजनेविषयी...