आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायणमूर्तींसह इन्फोसिसचे प्रमोटर विकणार 2 हजार कोटींचे शेअर; 13 हजार कोटींचे बायबॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्फोसिसचे एन.आर. नारायणमूर्ती व नंदन निलकेणींसह सर्व सहसंस्थापकांनी १.७७ कोटींचे शेअर विक्रीला काढण्याची ऑफर ठेवली आहे. कंपनीने १३ हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याची घोषणा केली आहे. बायबॅकची किंमत १ हजार १५० रुपये प्रति शेअर अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यात एकूण ११.३ कोटी शेअर खरेदी केले जाऊ शकतील. प्रमोटरद्वारे देऊ करण्यात आलेले सर्व शेअर खरेदी करण्यात आल्यास त्यांना २ हजार ३५ कोटी रुपये मिळतील.
 

इन्फोसिसचे संस्थापक व त्यांच्या कुटुंबियांकडे २९.२८ कोटींचे शेअर आहेत. अर्थात जून २०१७ च्या घोषणेनुसार कंपनीत त्यांची १२.७५ टक्के इक्विटी होल्डींग आहे. बायबॅकसाठी १ हजार १५० रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. बंगळुरू येथे मुख्यालय असलेली देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी अनेक महिन्यांपासून वादात आहे. मूर्ती यांनी माजी अध्यक्ष आर. शेषासायी व सीईआे विशाल सिक्का यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनावर उद्योजकीय प्रशासनसंबंधी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप लावला होता. शेषासायी व सिक्का यांनी सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी निलकेणी यांना कंपनीचे नवीन अध्यक्ष करण्यात आले.
 
बातम्या आणखी आहेत...