आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गार्डियन डेव्हलपर्सतर्फे प्रथमच १०० % व्याजमुक्त घरांची क्रांतिकारी योजना जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणेस्थित गार्डियन डेव्हलपर्स या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने घर खरेदीसाठीची प्रथमच शंभर टक्के कर्जमुक्त आणि व्याजमुक्त घरांची क्रांतिकारी योजना जाहीर केली आहे. यासंबंधीची घोषणा पत्रकार परिषदेत गार्डियन डेव्हलपर्सचे अध्यक्ष मनीष साबडे यांनी केली.
याप्रसंगी कंपनीचे संचालक उदय जाधव, मुख्य विपणन अधिकारी काजल मलिक यांचीउपस्थिती होती. ग्राहकांनी फ्लॅटची किंमत पुढील सात वर्षांत हप्त्याने फेडायची आहे. हा हप्ता साधारणत: पंधरा वर्षांसाठी घेण्यात येणाऱ्या गृहकर्जाच्या हप्त्याइतकाच असणार आहे. ग्राहकांना २१ ते ३० ऑगस्ट या कालावधीत कर्वेनगर येथील पंडित फार्म्सला भेट द्यावी लागणार असून तेथे फक्त एक लाख रुपये भरून सदर योजनेसाठी आपले नाव नोंदवता येणार आहे. शंभर टक्के व्याजमुक्त घराची ही विशेष योजना गार्डियन डेव्हलपर्सच्या ईस्टर्न मेडोज (खराडी अॅनेक्स), विंडशायर (किरकटवाडीजवळ, सिंहगड रस्ता), ग्रीनशायर (कासार- आंबोली, पिरंगुटजवळ) आणि वेस्टशायर (किवळे, पुणे- मुंबई बाह्यवळण मार्ग) या चार भव्य गृह प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.