आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PF Interest Rate Hiked To 8.8 Per Cent For 2015 16

खुशखबर ! दोन वर्षांनी PF च्‍या व्‍याजदरात वाढ, बोनसच्‍या चर्चेला पूर्णविराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्‍या श्रम मंत्रालयाने मंगळवारी 2015-16 या आर्थिक वर्षाकरिता भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात (पीएफ) वाढ करण्‍याचा निर्णय घेतला असून, आता 8.80 टक्‍के व्‍याज मिळणार आहे. काटकसर आणि बचतीच्या दृष्टीने केंद्राकडून गेल्या दोन वर्षांपासून 'पीएफ'चा व्याजदर 8.75 टक्‍क्‍यांवर स्थिर होता. या निणर्याचा तब्‍बल पाच कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

काय म्‍हणाले मंत्री
- केंद्रीय कामगार मंत्री दत्‍तात्रय बंडारू यांनी सांगितले, आम्‍ही पीएफच्‍या व्‍याजदरात 0.5 टक्‍क्‍यांनी वाढ करण्‍याचा निणर्य घेतला आहे.
- मागील दोन वर्षांपासून व्‍याजदरात वाढ झाली नव्‍हती.
बोनसच्‍या चर्चेला पूर्णविराम
भविष्य निर्वाह निधी संघटना पीएफच्‍या लाभधारकांना 750 कोटी रुपयांचे बोनस देणार असल्‍याचे वृत्‍त काही दिवसांपूर्वी आले होते. मात्र, आता केंद्राच्‍या या निणर्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.
दोन महिन्‍यांपूर्वी सरकारने घेतला होता आक्षेप
सातव्‍या वेतन आयोगामुळे आर्थिक बोजा वाढणार असून 'पीएफ' मधील व्याजदर वाढ परवडणार नाही, या उद्देशाने व्याजदर कायम ठेवण्याचे पत्रच अर्थ खात्याने भविष्य निर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) दोन महिन्‍यांपूर्वी पाठवले होते. परंतु, श्रम मंत्रालयाने पीएफ व्‍याजदारात वाढ करण्‍याचा निर्णय घेतला.