आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायटेक भिंती, स्विमिंग पूलमध्ये म्युझिक सिस्टम, असा आहे बिल गेट्स यांचा बंगला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिल गेट्स हे 'मायक्रोसॉफ्ट' या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. तसेच 'परोपकरी' म्हणुन देखील ते प्रसिद्ध आहेत. 'मायक्रोसॉफ्ट' ही कंपनी पॉल एलीन आणि बिल गेट्स या दोघांनी मिळून स्थापन केली होती. मायक्रोसॉफ्टमधे असताना ते सॉफ्टवेअर बांधणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी अनेक पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत.
बिल गेट्स यांचा जन्म सिऍटल, वॉशिंग्टन, डी.सी. येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम्स ऐच. गेट्स व आईचे नाव मॅरी मॅकसवेल गेट्स आहे. त्यांचे आईवडील इंग्लिश, जर्मन, स्कॉट-आयरिश वंशाचे आहेत. बिल गेट्स यांच्या मोठ्या बहिणीचे नाव क्रिस्टी व छोट्या बहिणीचे नाव लिबी आहे.
2000 मध्ये सोडले होते सीईओ पद
बिल गेट्स यांनी 2000 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ पद सोडले होते. नंतर त्यांनी कंपनीत राहून विविध जबाबदार्‍या यशस्वीरित्या पार पाडल्या. 59 वर्षीय बिल गेट्स आज कंपनीचे 'टेक्नॉलॉजी अॅडव्हायझर' आहेत.

'टेक हाऊस' सीरीजमधून आम्ही आपल्यासाठी बिल गेट्‍स यांच्या आलिशान बंगल्याविषयी माहिती घेऊन आलो आहोत.
बिल गेट्स यांचा आलिशान बंगला वॉशिंग्टनमध्ये एका तळ्याकाठी आहे. 'शानाडू' असे या बंगल्याचे नाव आहे. शानाडू 1.5 एकर (66,000 स्क्वेअर फूट) जागेत विकसित करण्‍यात आले आहे. बंगल्यात 7 बेडरूम, 24 बाथरूम, 6 किचन, स्विमिंग पूल, 2,300 स्क्वेअर फूटाचा रिसेप्शन हॉल आणि 2,500 स्क्वेअर फूटाचे जिमची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शानदार इंटीरियरसोबतच बंगला अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने अद्ययावत आहेत.

1. हायटेक भिंती:
'मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक बिल गेट्‍स यांची 'टेक्नॉलॉजी'वर प्रचंड निष्ठा आहे. उल्लेखनिय म्हणजे गेट्‍स यांनी आपल्या घरातील भिंतीमध्येही टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर केला आहे. बिल गेट्स यांच्या घराच्या भिंती हायटेक आहेत. भिंतीला टच करताच भिंतीवरील 'आर्टवर्क' बदलते. बंगल्याच्या भिंती उभारतानाच त्यात अनेक थिम्स आणि वॉल पेपर स्टोअर करण्‍यात आले आहेत. गेट्स तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आपल्या आवडीनुसार थिम्स बदलत असतात. यासाठी गेट्‍स यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

(Source: Business Insider)
(Image Source: Imagefiesta.com)

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, बिल गेट्स यांच्या बंगल्यासंदर्भातील काही रोचक फॅक्ट्‍स आणि पाहा फोटो...