आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळापर्यंत हेलिकॉप्टरने जातात हे उद्योगपती, राहत होते चाळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच घरातून  गौतम अदानी यांच्‍या उद्योगाची सुरुवात झाली. - Divya Marathi
याच घरातून गौतम अदानी यांच्‍या उद्योगाची सुरुवात झाली.
अहमदाबाद - देशातील सर्वाधिक श्रीमंताच्‍या यादीत 11 व्‍या क्रमांकवर असलेले गुजरातचे उद्योगपती गौतम अडानी यांचा 24 जूनला वाढदिवस आहे. एकेकाळी चाळीत राहणारे आणि स्‍कुटरवर फि‍रणारे अडाणी हे विमानतळापर्यंत कारने नव्‍हे तर हेलिकॉप्‍टरने जातात. त्‍यांच्‍या बद्दल ही रंजक माहिती...

स्‍वत:च्‍या मालकीचे 3 हेलिकॉप्टर व 3 चार्टर्ड प्लेन
अहमदाबादच्या एका सामान्य कुटुंबात या भारतीय उद्योगपतीचा जन्म झाला. गौतम अदानी असे या उद्योगपतीचे नाव. अदानी समुहाचे ते अध्यक्ष आहे. कधी काळी ते स्कूटर चालवत होते. नंतर मारुती 800 तर आज ते BMW आणि फेरारीच नव्हे तर तीन 3 हेलिकॉप्टर व 3 चार्टर्ड प्लेनचे मालक आहे.

12वीपर्यंत शिकलेले अदानी अब्जोंच्या प्रॉपर्टीचे मालक...

'फोर्ब्स'नुसार, 12 वीपर्यंत शिकलेले गौतम अदानींचा समावेश देशातील सर्वाधिक धनाढ्य उद्योगपतींच्या यादीत करण्यात आला आहे. अदानी हे देशातील 11 वे गर्भश्रीमंत उद्योजक आहेत. अदानींकडे 43056 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानींच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 30,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कोळशाच्या खाणी, विद्युत निर्मिती, लॉजिस्टिक्स, रियल एस्टेट, एग्रो प्रॉडक्ट्स, ऑइल व गॅस सारख्या क्षेत्रात त्यांच्या कंपन्या आहेत.

'कॉलेज ड्रॉप आउट' आहे अदानी
वडिलांना बिझनेसमध्ये मदत न करते शिक्षण अर्ध्यात सोडून गौतम अदानी यांनी मुंबई गाठली. यावेळी त्यांचे वय 18 वर्षे होते. हिर्‍याचे व्यापारी महिंद्रा ब्रदर्ससोबत त्यांनी दोन वर्षे काम केले. वयाच्या 20 वर्षी अदानींनी मुंबईत स्वत:चा डायमंड ब्रोकरेजचा बिझनेस सुरु केला. पहिल्याच वर्षी त्यांच्या बिझनेसचा लाखोंचा टर्नओव्हर होता.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, प्लास्टिक फॅक्टरीतही केले काम...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)