आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाराप्रमुख सुब्रतोंचा पॅरोल २८ नोव्हेंबरपर्यंत वाढवला, सेबीकडे २०० कोटी रुपये जमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहारा समूहाच्या वतीने शुक्रवारी सेबीकडे २०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सहाराला ३० नोव्हेंबरपर्यंत १८० कोटी रुपये आणखी जमा करायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या पॅरोलला २८ नोव्हेंबरपर्यंत वाढ दिली आहे. समूहाने सेबीकडे २०० कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाची सुनावणी २४ नोव्हेंबरएेवजी शुक्रवारीच घेण्यात यावी अशी विनंती समूहाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने मान्यता दिली होती.
सेबी आणि सहारा समूहादरम्यान गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत करण्यासंदर्भात हा वाद सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील तीन सदस्यीय पीठासमोर सुरू आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर, न्या. दवे आणि न्या. ए. केक सिकरी यांचा समावेश आहे.

या आधी सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला १२ हजार कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले हाेते. तसेच ते कसे जमा करणार याचीही माहिती मागितली होती. सहाराने आपली मालमत्ता लपवल्याप्रकरणीदेखील न्यायालयाने फटकारले होते. ३ सप्टेंबर रोजी सुनावणीदरम्यान सहारा समूहाने गुंतवणूकदारांना २४ हजार कोटी रुपये परत केले असल्याचे सांगितले होते. मात्र, इतके जास्त पैसे नगदी देण्यासंदर्भातही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सुब्रतो रॉय गेल्या सहा मेपासून पॅरोलवर बाहेर आहेत. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांना न्यायालयाने पॅरोल मंजूर केला होता.

मल्ल्याला २४ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश
नवी दिल्ली | कर्नाटक उच्च न्यायालयाने उद्योगपती विजय मल्ल्याला २४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कर्ज वसुली प्राधिकरणाच्या बंगळुरू येथील पीठासमोर मल्ल्याने आपल्या संपत्तीची विक्री, गहाण किंवा कोणत्याही प्रकारचा सौदा करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्याने आपले शेअर खासगी आंतरराष्ट्रीय बँकेकडे गहाण ठेवले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...