आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिनोलेक्स : मेक इन इंडिया, ओन्ली फॉर इंडिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीव्हीसी-यू पाइप्स आणि फिटिंग्ज उत्पादन क्षेत्रात फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही देशातील प्रमुख, तर पीव्हीसी रेजिन बनवणारी दुसरी मोठी कंपनी आहे. कंपनीची गुणवत्ता कायम राखण्याची परंपरा संस्थापक प्रल्हाद छाबडिया यांच्याकडून मिळाली असल्याचे मत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश सी. छाबडिया यांनी व्यक्त केले. याच जोरावर समूहाने एक अब्ज डॉलरची वार्षिक उलाढाल असणारी भारतीय कंपनी बनण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यांच्याशी 'दिव्य मराठी'ने साधलेल्या संवादाचा संपादित भाग :


> आम्हाला अापल्या कंपनीविषयी सांगा ?
फिनोलेक्स इंडस्ट्रीज ही आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली पीव्हीसी पाइप तयार करणारी कंपनी आहे. आम्ही सुमारे ३५० प्रकारचे पाइप तसेच १,००० पेक्षा जास्त फिटिंग्ज बनवतो. निर्यातीसंदर्भात सध्यातरी योजना तयार करण्यात आलेली नाही. आम्ही १०० टक्के उत्पादने देशातच बनवून भारतातच विक्री करतो. "मेक इन इंडिया, ओन्ली फॉर इंडिया' हा आमचा मूळ मंत्र आहे. मात्र, जगभरातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही घेऊन येतो. इस्रायलमधील कंपन्यांशी करार करणारी ही देशातील पहिली कंपनी आहे.
> अकृषी उत्पादनाबाबत आपल्या काेणत्या योजना अाहेत?
वाढती लोकसंख्या पाहता पाण्याची साठवणूक, वितरण आणि खराब पाण्याची विल्हेवाट महत्त्वाची झाली आहे. या दृष्टीने आवश्यक असणारी उत्पादने आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आमचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्न कृषी पाइपांच्या माध्यमातून येते. आता अकृषी पाइपची विक्री वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट अाहे.
> व्यवसायाच्या विस्तारासंदर्भातील योजनांच्या बाबतीत सांगा ?
फिनोलेक्सची उत्पादने पूर्ण देशात विक्री होतात. आता आम्ही लवकरच कटक (ओडिशा), इंदूर (मध्य प्रदेश) आणि दिल्लीमध्ये नवे वेअरहाऊसेस बनवणार आहोत. मार्केटिंगसाठी कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यात येत आहे. येत्या पाच वर्षांत नवीन प्रकारचे पाइप बाजारात आणण्याची योजना आहे. पुणे, रत्नागिरी आणि गुजरातमधील प्रकल्पात उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे कंपनीचे वार्षिक उत्पादन अडीच लाख मेट्रिक टनापर्यंत वाढेल.
> देशातील अनेक भागांत दुष्काळाचे संकट अाहे, त्याचा अापल्या व्यवसायावर काय परिणाम झाला?
पाण्याची समस्या हे आजचे वास्तव आहे. देशातील शेती ही मुख्यत: मान्सूनवर आधारित आहे. पाऊस वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पडला नाही तर शेतकरी अडचणीत येतो. या समस्येचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. याचा अामच्या व्यवसायावर कोणताच परिणाम झालेला नाही. आम्ही दरवर्षी दोन अंकी विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आम्ही कर्जाचे ओझेदेखील कमी केले आहे.
> एनडीए सरकारचा दोन वर्षांच्या कार्यकाळ कसा वाटतो ?
एनडीए सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष ठेवूनच काम करत आहे. शेतकरी समृद्ध झाला तर प्रत्येक क्षेत्रात वाढ दिसून येते. आधार कार्ड, जन-धन योजनेच्या माध्यमातून योग्य लाभार्थींच्या खात्यात सबसिडी आणि इतर लाभ देण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे.
बातम्या आणखी आहेत...