Home »Business »Business Special» IPhone 8, IPhone 7s And 7s Plus Photos Leaked On Twitter

iPhone 8, iPhone 7s आणि 7s Plus चे नवे फोटोस लीक, लकरच होणार लॉन्च

दिव्य मराठी वेब टीम | May 23, 2017, 19:03 PM IST

मुंबई -अॅपलचे नवे iPhone 8 लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार अशी उत्सुकता असताना iPhone 8, iPhone 7s आणि 7s Plus चे नवे फोटोस लीक झाले आहेत. एका ट्वीटर युझरने आपल्या अकाउंटवर ही छायाचित्रे जाहीर केली आहेत. या वर्षीच अॅपल आपले हे तिन्ही फोन लॉन्च करणार आहे.
नव्या iPhone 8 मध्ये कंपनी अत्याधुनिक थ्रीडी सेन्सिंग कॅमेरा लावणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. नव्या आयफोनच्या आकारात सुद्धा काहीसा बदल होऊ शकतो. यापूर्वीचे आयफोन लॉन्च करताना अॅपलने हेडफोनची पिन गायब केली. तसेच वायरलेस इयरपॉड्स जाहीर केले. यावेळी अॅपल होम बटन गायब करणार असा अंदाज आहे. तर, काहींनी iPhone 8, iPhone 7s आणि 7s Plus मधून चार्जिंगचे पिन नेहमीसाठी हटवून त्यांना वायरलेस बॅटरी चार्जिंग देणार असे भाकित वर्तवले आहे.

Next Article

Recommended