आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात आयफोन विक्रीत ५०% वाढ, जगात टक्क्यांनी घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- पंधरा वर्षांत पहिल्यांदा वार्षिक व्यवसाय आणि नफ्यामध्ये घट झाल्यानंतर आता अॅपलला भारताकडून आशा आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात आयफोनची विक्री ५० टक्के वाढली असल्याची माहिती सीईओ टीम कुक यांनी दिली.

विविध टेलिकॉम कंपन्यांनी फोर जी सेवा देण्यास सुरुवात केल्याने विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

चीनप्रमाणे भारताचा बाजार वाढण्याची शक्यता आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना कुक म्हणाले, २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांची संख्या, फोर जीचे वाढते इन्फ्रास्ट्रक्चर आणि मध्यमवर्गात स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे भारतात विकास होईल. कॅनडा, लॅटिन अमेरिका, युरोप आणि दक्षिण अाफ्रिका यांच्यासह भारतात आयफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली जात आहे. एका वर्षापासून अॅपलने भारताला प्राधान्य दिले आहे. देशात अॅपल स्टोअर आणण्याचा कंपनी विचार करत आहे. आयफोन भारतात उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त आयफोन आहे. भारतीय बाजारात याची लोकप्रियता कायम आहे. आयफोन आणि आयफोन प्लसला पसंती मिळत आहे. अॅपलचा नवीन फोन ऑक्टोबरला भारतात लाँच होईल. अॅपलला डिसेंबरच्या तिमाहीत ७६-७८ अब्ज डॉलर महसुलाची अपेक्षा आहे.

वार्षिक विक्री टक्के, नफा १४ टक्के घटला
अॅपलच्या महसूल आणि नफ्यात २००१ नंतर पहिल्यांदा घसरण झाली. २४ सप्टेंबर २०१६ रोजीे संपलेल्या आर्थिक वर्षात अॅपलचा महसूल २१५.६ अब्ज होता. मागील वर्षीच्या तुलनेत तो टक्क्यांनी कमी आहे. मागील आर्थिक वर्षात अॅपलने २३३.७ अब्ज डॉलरची विक्रमी विक्री केली होती. विक्री घटल्याने नफ्यावर परिणाम झाला. नफा १४ टक्के घटून ४५.७ अब्ज डॉलरवर आला.

मार्जिन 40 टक्के घटले
टीम कुक यांच्या मते, आयफोन प्लसची मागणी पुरवठ्याच्या तुलनेत जास्त आहे.
तज्ज्ञांच्या मते, महाग फोनचा बाजार चांगला आहे. ग्राहक बरीच वर्षे फोन बदलत नाहीत.
चीनमध्ये विक्री ३० टक्के घटली. येथे शॉओमी, हुवावे यांच्याशी टक्कर आहे.
बातम्या आणखी आहेत...