आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोन: स्क्रीनसाठी सॅमसंगवर अवलंबून असल्याने यंदा मिळेल 9 आठवडे उशिरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयफोन X ची लाँचिंग आणि विक्री सुरू होण्यात सुमारे ९ आठवड्यांचे अंतर आहे. असे पहिल्यांदाच होत आहे. याआधी आयफोनची लाँचिंगच्या एक आठवड्याच्या आत बुकिंग आणि त्याची विक्री आठवडाभरात सुरू होत होती. मात्र, या वेळी ओएलईडी स्क्रीनमुळे याला उशीर होत आहे. ही स्क्रीन दोन कंपन्या तयार करते - सॅमसंग आणि एलजी. सॅमसंगला ओएलईडी सर्वात चांगला असल्याचे मानले जाते. स्क्रीनसाठी अॅपल स्पर्धकावर अवलंबून आहे. सॅमसंगनेही नोट-८ आणि एस-८मध्ये याचा वापर केला आहे. सॅमसंग आणि आपल्या उत्पादनाची मागणी पूर्ण केल्यानंतर अॅपलला पुरवठा करेल. नोट-८ची विक्री २१ सप्टेंबरपासून सुरू होईल.  
 
अॅपलने सॅमसंगला ७ कोटी स्क्रीनची ऑर्डर दिली आहे. एका स्क्रीनची किंमत १२० - १३० डॉलर (७,६८० ते ८,३२० रु.) आहे. आयफोन - ७ प्लसची ५.५ इंच एलसीडी स्क्रीन ४५ - ५५ डॉलर (२,८८० - ३,५२० रु.) ची आहे. सॅमसंगवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अॅपल दुसऱ्या कंपनीचा शोध घेत आहे. ही कंपनी एलजीमध्ये १३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचीही चर्चा आहे. असे असले तरी एलजी या स्क्रीनचा पुरवठा पुढील वर्षीपासूनच करू शकेल.  
 
केवळ ११% नवे मॉडेल  खरेदीसाठी तयार 
आयफोन X ची किंमत लोकांसाठी अडचणीची ठरू शकते. बार्कलेजने आयफोन वापरणाऱ्यांमध्ये सर्व्हे केला असून केवळ १८ % लोकांनी सांगितले की, ते १,००० डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचा फोन खरेदी करू शकतात. केवळ ११% म्हणाले की, ते इतका महागडा फोन खरेदी करतील. किमतीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आयफोन X महाग वाटू शकतो, कारण जवळपास सारखे फीचर्स असलेले फोन २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.  
 
पुढील स्‍लाइडवर पहा,  
> भारतात आयफोन X ची विक्री नोव्हेंबरमध्ये सुरू होईल...
> आयफोन ८ आणि ८ प्लसची बुकिंग १५ सप्टेंबर व विक्री २९ सप्टेंबरपासून सुरू होईल...
बातम्या आणखी आहेत...