आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळेच नीता अंबानींनी बंद केला होता कन्या ईशाचा डान्स क्लास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष व देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची सहचारिणी व बिझनेसवुमन नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. मुकेश अंबानी हे आपला वाढदिवस साजरा करत नाहीत. मात्र, पत्नी व मुलांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करतात.

नीता यांच्या वाढदिवसानिर्मित आम्ही सुरू केलेल्या मालिकेत नीता अंबानींसह त्यांच्या कुटुंबाशी संबंधित खास माहिती घेवून आलो आहोत.

नीता अंबानी यांनी भीतीपोटी कन्या ईशाचा डान्स क्लास बंद केला होता. नीता अंबानी कधीकाळी एक भरत नाट्यम नृत्यांगणा होत्या. ईशाने देखील आपल्यासारखे भरत नाट्यम नृत्याचे धडे घ्यावे, अशी नीता यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी घराजवळील एका डान्स क्लासमध्ये ईशाला पाठवण्यास सुरुवात केली. तेव्हा ईशा फक्त पाच वर्षांची होती. ईशाला डान्स क्लासचा रस्ता लक्षात राहावा म्हणून एके दिवशी नीता यांनी तिला एकटेच पाठवले. परंतु,ईशा रस्ता भरकटी आणि एक झाडाखाली बसून फुंडून-फुंडून रडू लागली. त्यानंतर ईशाला एकटे कुठेच पाठवायचे नाही, असे नीता यांनी ठरवले. त्यामुळे तेव्हापासून ईशा आजपर्यंत कधी डान्स क्लासला गेली नाही.

सध्या बिझनेस सांभाळते आहे ईशा
ईशा अंबानी ही रिलायन्सची टेलिकॉम व रिटेल कंपनीची डायरेक्टर बनली आहे. 2008 मध्ये 16 वर्षाच्या वयात ईशा पहिल्यांदा चर्चेत आली होती. 'फोर्ब्स'च्या लिस्टनुसार, धनाढ्य वारसांच्या यादीत ईशाला दुसर्‍या क्रमांकाचे स्थान देण्यात आले होते.

स्टूडेंट काउंसिलची अध्यक्षा होती ईशा
विद्यार्थीदशेत असताना ईशा अंबानी स्टूडेंट काउंसिलची अध्यक्ष होती. तसेच ती फुटबॉल टीमची सदस्यही होती. याशिवाय ईशा एक ट्रेंड पियानो आर्टिस्ट आहे. ईशाने 2013 मध्ये येल यूनिव्हर्सिटीतून सायकोलॉजी व साउथ आशियन स्टडीजमध्ये पदवी घेतली. रिलायन्स कंपनीत रुजू होण्यापूर्वी ती अमेरिकेतील ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म मॅकेंजीमध्ये नोकरी करत होती.

पुढील स्लाइडवर वाचा, नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचे निवडक फोटोज...