आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IT Company CEO And Founder Information In Marathi

आधीच्या काळात असे दिसायचे दिग्गज आयटी कंपन्यांचे सीईओ आणि संस्थापक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा कोणी एखाद्या मोठ्या पदावर जातो, तो प्रसिद्ध होतो. सगळे जग त्याला ओळखू लागते; परंतु प्रसिद्ध होण्याआधी तो कसा दिसत असेल, याची काही मोजक्या लोकांनाच माहिती असते. त्यांचे बालपण कसे होते? या दिग्गज आयटी कंपन्यांचे सीईओ आणि संस्थापकांना येथे जाणून घ्या, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कंपनीची स्थापना केली. या व्यक्तिमत्त्वात युवा अवस्थेतच भविष्यात काही तरी भव्य करण्याचे, करून दाखवण्याचे धाडस होते. त्यांच्या लहानपणीची आणि तरुणपणातील काही चित्रे त्यांच्या अल्बममधून घेतलेली आहेत.
मार्क झुकेरबर्ग, फेसबुक
१४ मे १९८४ म्हणजे ३१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी न्यूयॉर्कमध्ये मार्क झुकेरबर्गचा जन्म झाला. वडिलांचे नाव एडवर्ड, व्यवसायाने डेंटिस्ट आणि आई केरन मनोचिकित्सक होती. झुकेरबर्गना तीन बहिणी होत्या. ते १३ वर्षे यहुदी संस्कारात वाढले. त्यानंतर नास्तिक बनले. शालेय जीवनात त्यांनी गणित, अ‍ॅस्ट्रॉनॉमी, फिजिक्समध्ये अनेक अवॉर्ड जिंकले. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंगचे वेड त्यांना हार्वर्डमध्ये शिकत असतानाही कायम होते.
शिक्षण पूर्ण करण्याआधी सहकाऱ्यासोबत त्यांनी फेब्रुवारी २००४ मध्ये फेसबुकची स्थापना केली. आज १०,०८२ कर्मचारी असलेल्या फेसबुक कंपनीकडे २४९१ अब्ज रुपये इतकी संपत्ती आणि २०१४ मध्ये ७७२ कोटी रुपये इतके वार्षिक उत्पन्न होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, असे दिसायचे दिग्गज आयटी कंपन्यांचे सीईओ आणि संस्थापक...