आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीसी मार्केट कॅपमध्ये 50 हजार कोटींची घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सिगारेटवर सेस वाढल्यामुळे मंगळवारी आयटीसीच्या शेअरमध्ये १२.६३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. यामुळे कंपनीचा मार्केट कॅप एकाच दिवसात ४९,७३१ कोटी रुपयांच्या खाली आला आहे. कंपनीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीची १६.२९ टक्के आणि यूटीआय (सुटी) ची ९.०९ टक्के भागीदारी आहे. या दृष्टीने या कंपन्यांचे नुकसान सुमारे १२,६०० कोटी रुपयांचे आहे. सिगारेटवर सेस वाढणार असल्याच्या चर्चेमुळे देखील सोमवारी आयटीसीच्या शेअरमध्ये घसरण झाली होती. या दोन दिवसात कंपनीचा मार्केट कॅप ६३,९७० कोटी रुपयांनी कमी झाला आहे. असे असले तरी ही देशातील चौथी सर्वात मोठी कंपनी कायम आहे.  

आयटीसीचे शेअर सोमवारच्या तुलनेत १३.३२ टक्क्यांच्या घसरणीसह २८२.३५ रुपयांवर उघडले. व्यवहारादरम्यान हा १५ टक्के म्हणजेच २८४.६० रुपयांवर खाली आला. तर व्यवहाराच्या शेवटी हा २८४.९० रुपयांवर बंद झाला. सिगारेट बनवणाऱ्या दुसऱ्या कंपन्यांमध्ये व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये ७.८३ टक्के, गाॅडफ्रे फिलिप्समध्ये ५.६९ टक्के आणि गोल्डन टोबॅको मध्ये ३.६३ टक्क्यांची घसरण झाली. अायटीसीनंतर सेन्सेक्समध्ये सर्वात जास्त २.०३ टक्क्यांची घसरण रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये झाली. याचा परिणाम पूर्ण शेअर बाजारावर दिसून आला.  

एक दिवस आधीच विक्रमी उच्चांकावर बंद झालेला मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स १.१३ टक्के म्हणजेच ३६३.७९ अंकाच्या घसरणीसह ३१,७१०.९९ या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी मध्येही ०.९० टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये १४ मार्च आणि निफ्टीमध्ये १८ मार्च नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.
बातम्या आणखी आहेत...