आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प बळकटीचा भारत, कॅनडाचा संकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो - आर्थिक क्षेत्रात भारत व कॅनडा यांच्यातील भागीदारी आणखी बळकट करण्यावर उभय देशांत सहमती झाली आहे. त्याचबरोबर भागीदारीत वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

आर्थिक क्षेत्रातील भागीदारीची वाटचाल सुकर व्हावी, यासाठी दोन्ही देशांचे तज्ज्ञ लवकरच एकत्र येऊन विचारविनियम करतील, असे जेटली म्हणाले. जेटली व त्यांचे समकक्ष बिल मोर्निऊ, आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांच्याशी सोमवारी द्विपक्षीय चर्चा केली. समग्र आर्थिक भागीदारी सामंजस्य करार व थेट परकीय गंुतवणूक व संरक्षण करार अशा मुख्य करारांवर दोन्ही देशांत सहमती झाली आहे. दोन्ही देशांनी सामरिक पातळीवरदेखील सहकार्य करण्यावर तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय जेटली यांनी कॅनडातील निवृत्तिवेतन फंड, बँकर्स, वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशीदेखील सोमवारी चर्चा केली. दरम्यान, जेटली व त्यांचे कॅनडाचे समकक्ष याच महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँका, जी-२० अर्थमंत्र्यांच्या बैठकीतदेखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत सहकार्यवाढीला संधी मिळणार आहे. उभय देशांत प्रदीर्घ काळापासून द्विपक्षीय संबंध आहेत. दोन्ही देश लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील चांगली मैत्री पाहायला मिळते.

१२ अब्ज डॉलरची गुंतवणूक
गेल्या दोन वर्षांत कॅनडाने भारताने थेट परदेशी गुंतवणुकीअंतर्गत सुमारे १२ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...