आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता सहकारी बँकेची दुष्काळग्रस्त गावांना मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जनता सहकारी बँक लि. पुणेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक, जालना, मुंबई, मुलुंड (प.), गांधीनगर कोल्हापूर, लांजा-जिल्हा रत्नागिरी आणि पुण्यातील वारजे माळवाडी या सहा शाखांचा शुभारंभ केला जाणार आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेतर्फे रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील जालना, लातूर आणि उदगीर परिसरातील दुष्काळग्रस्त गावांना पाण्याच्या टाक्या आणि चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जनकल्याण समितीला १५ लाखांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष संजय लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत केतकर तसेच संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. या नवीन शाखांमुळे बँकेच्या एकूण ५४ ठिकाणी शाखा होणार आहेत.