आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jetali Says, Government Think On The Report Of Shom Committee

शोम समितीच्या शिफारशींवर सरकारचा विचार सुरू : जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अर्थसंकल्प २०१६-१७ च्या आधी कर प्रणाली सोपी बनवण्यासाठी बनवण्यात अालेल्या पार्थसारथी शोम यांच्या समितीच्या शिफारशींचा विचार करण्यात येत असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. आयकर अपील लवादाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शोम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कर प्रणालीमध्ये अनेक सुधारणा सुचवल्या असल्याचे जेटली यांनी सांगितले. या समितीने जून २०१४ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. यासंदर्भात न्यायमूर्ती आर. व्ही. ईश्वर यांच्या नेतृत्वातदेखील आयकर कायद्यातील सुधारणांसाठी समिती बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.