आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिऱ्यासह मिरचीचा तडका, उत्पादनात घट झाल्याने किमतीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तूरडाळीच्या महागाईमुळे एकीकडे सर्वसामान्य त्रस्त झाले असताना जिरे अाणि मिरचीच्या किंमतवाढीने डाेके वर काढल्याने महिन्याचे बजेट बिघडले अाहे. अवकाळी पावसाचा फटका अाणि उत्पादन घट यामुळे जिरे मिरचीच्या किमतीत वाढ झाली आहे.
राजस्थाननंतर जिरे पिकवण्यात गुजरातचा दुसरा क्रमांक लागताे. २०१४-१५ वर्षातल्या २,६६,७०० एकरच्या तुलनेत गेल्या वर्षामध्ये राज्यात जास्त म्हणजे २,९५,४०० हेक्टर क्षेत्रफळावर जिऱ्याची लागवड करण्यात अाली हाेती; परंतु जमिनीतील अार्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे अाॅक्टाेबरमध्ये जिरा लागवडीला विलंब झाला. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत हवेतील उबदारपणामुळे पिकाचे उत्पादन घटले. गरम हवामान अाणि लागवडीखालील घटलेले क्षेत्रफळ यामुळे राजस्थानमध्ये यंदाच्या वर्षात जिरे उत्पादन घटण्याचा अंदाज अाहे.

जिरा पिकावर कमी पावसाचा परिणाम जरी असला तरी गेल्या दाेन वर्षांपासून उत्पादन कमी अाहे. अन्य देशांमधून निर्यातीची वाढलेली मागणीदेखील किंमत वाढण्यास कारणीभूत अाहे. गेल्या दीड महिन्यात १५० रुपये किलाे असलेल्या जिऱ्याचा भाव अाता १७० रुपयांवर गेला अाहे. जिऱ्याच्या किमती कमी हाेण्यासाठी पुढील मार्च ते एप्रिल महिना लागणार असून ताेपर्यंत जिऱ्याच्या किमती २०० रुपयांचा टप्पा गाठतील, अशी भीती पी. डी. इंटरनॅशनलचे जिरे व्यापारी परेश मेहता यांनी व्यक्त केली.

मिरचीचा ठसका
मार्चते एप्रिल म्हणजे वर्षभराचा मसाला तयार करून ठेवण्याचा मुख्य कालावधी. अांध्र प्रदेश अाणि कर्नाटकातील उत्पादन अवकाळी पावसामुळे घटल्याचा फटका सुकलेल्या लाल मिरचीला बसला अाहे. त्यामुळे या मिरच्यांचा भाव किलाेमागे पाच टक्क्यांनी वाढून ताे १८० रुपयांवरून २०० रुपयांवर गेला अाहे. घराेघरी वर्षभराचा मसाला बनवण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे सध्या या िमरचीच्या ग्राहकांची संख्या दीडपटीने वाढली असून त्या तुलनेत माल कमी पडत अाहे. त्यामुळेदेखील ही दरवाढ झालेली अाहे. जानेवारीपर्यंत नवीन पीक येणार नसल्यामुळे सप्टेंबरपर्यंत भाव चढेच राहण्याची भीती उद्योजक संकेत खामकर यांनी व्यक्त केली.

वायदा बाजारामुळे महागाई
जिरा पिकावर पावसाचा परिणाम झालेला असला तरी वायदा बाजार हेच महागाई हाेण्याचे मूळ कारण अाहे. मिरची, जिरा यासारख्या जीवनावश्यक वस्तूदेखील वायदे बाजारात समाविष्ट असून त्यामुळे सटाेडियांचे फावते. त्यामुळे सरकारने यावर तातडीने उपाययाेजना केल्यास बऱ्याचशा गाेष्टी नियंत्रणात येऊ शकतील. निर्यातीची वाढलेली मागणी अाणि सट्टाबाजार यामुळे जिऱ्याचे भाव वाढलेले असले तरी त्यातही चढ- उतार हाेत असल्याचे मत नवी मुंबई मर्चंट असाेसिएशनचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी व्यक्त केले. मसाला व्यापारी चुनीलाल मालदे म्हणाले की, गेल्या एक ते दीड महिन्यात जिऱ्याचा किरकाेळ विक्रीचा दर २२० ते २४० रुपयांवर गेला अाहे.

निर्यात मागणी वाढणार
वाणिज्य खात्याच्या अाकडेवारीनुसार २०१५-१६ वर्षातल्या पहिल्या अकरा महिन्यांमध्ये ७१,९८३ टन जिरा निर्यात झाली असून अगाेदरच्या वर्षातल्या ३७,७४२ टनांच्या तुलनेत ती जास्त अाहे. पावसाळ्यामध्ये जिऱ्याची प्रत्यक्ष अावक हाेण्यामध्ये अडचणी निर्माण हाेण्याची शक्यता लक्षात घेता मे महिन्यात निर्यात मागणी अाणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...