आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण : देशात नव्या वर्षात दहा लाख रोजगाराच्या संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रोजगाराचा विचार केल्यास नवीन वर्ष खूप चांगले ठरणार आहे. २०१६ मध्ये देशातील कंपन्यांच्या वतीने १० लाख नागरिकांना रोजगार दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच नोकरदारांच्या पगारातदेखील १० ते ३० टक्के पगारवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोजगार आणि पगारवाढ या दृष्टीने २०१५ चांगले वर्ष ठरले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच आता २०१६ मध्येदेखील चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील. देशाच्या अर्थव्यवस्थेतील विकास सकारात्मक असून त्याच बरोबर रिटेल, फायनान्स आणि टेक्नॉलॉजीसारख्या अनेक क्षेत्रांत नव्या कंपन्या सुरू होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रोजगाराच्या दृष्टीनेही २०१६ हे वर्ष विशेष राहणार असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मोठ्या कंपन्यांत संधी
या विकासाच्या दृष्टीने एप्रिलदरम्यान पगारातदेखील मोठी वाढ होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील मोठ्या कंपन्यादेखील २०१६ मध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहेत. या सर्वेक्षणात १२ उद्योगांशी संबंधित २१ मोठ्या शहरांमध्ये ५४८० कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता.

पुढे वाचा, कोणकोणत्या गोष्टींमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत...
बातम्या आणखी आहेत...