आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिहीन असूनही ज्योत्स्ना आहेत गुगलच्या दिव्यांग टीमच्या प्रमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - दृष्टिहीन असणाऱ्या ज्योत्स्ना यांना जेव्हा गुगलमधून फोन आला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यांनी नोकरीसाठी अर्ज केलेला नव्हता. अंध असल्याने गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याचा विचारही त्यांनी कधी केला नाही; परंतु १० वर्षांपूर्वी त्यांच्या भावाने त्यांना न सांगताच गुगलला बायोडाटा पाठवला होता. त्या वेळी गुगलमध्ये दिव्यांग व्यक्तींना मदत व्हावी यासाठी अर्धवेळ काम करणारी टीम होती. त्या टीममध्ये ज्योत्स्ना यांच्यासाठी जागा नव्हती, परंतु तरीही त्यांना फोन आला आणि ज्योत्स्ना यांनी टेस्ट इंजिनिअर म्हणून नोकरी स्वीकारली. सद्य:स्थितीत त्या टीमच्या प्रमुख आहेत.

ज्योत्स्ना या जन्मत: दृष्टिहीन नाहीत. बालपणी त्यांच्या मेंदूत गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. ही बाब कळाल्यानंतरही त्यांनी धाडसाने जगण्याचा ध्यास सोडला नाही. महाविद्यालयीन शिक्षण सुरू करतानाच त्यांनी चार वर्षांत पदवी शिक्षण पूर्ण करणे, उत्तम टक्केवारी संपादन करणे, आठवड्याच्या शेवटी कधीही अभ्यास करणार नाही, अशी तीन लक्ष्ये ठरवली होती. ती गाठण्यासाठी त्यांनी स्वत:चा टाइमटेबल ठरवला. यात त्या सकाळी सहा वाजता उठून नऊ वाजता महाविद्यालयात पोहोचायच्या, वसतिगृहात परल्यानंतर ज्या दिवशीचा गृहपाठ त्याच दिवशी पूर्ण करायच्या. दोन वर्षांनंतर एके दिवशी सकाळी त्यांना अंधुक दिसत होते. त्यांनी डॉक्टरांना दाखवले तेव्हा मेंदूची गाठ डोळ्यांच्या नसांपर्यंत (ऑप्टिक नर्व्ह) पोहोचल्याचे निदान झाले. डोळ्यातील रेटिनापासून व्हिजन सेंटरपर्यंत सूचना पाठवण्याचे काम ही नस करत असते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गाठ काढण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतर ज्योत्स्ना यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना काही दिसत नव्हते.

त्यांच्या ऑप्टिकल नर्व्हला जखम झाली होती. काही दिवसांनी त्यांनी महाविद्यालयात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ब्रेल िलपी शिकल्या, स्क्रीन रीडरसारखे तंत्रज्ञानही जाणले. या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्ती संगणकाचा वापर करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...