नवी दिल्ली - भारतातील विश्वसनीय वॉटर प्युरिफायर ब्रँड केंट आरओने “शुद्ध पाण्या’सोबतच “शुद्ध हवा’ असा संदेश देत नवीन मार्केटिंग अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत कंपनीने एअर प्युरिफायरची सर्वोत्तम तसेच आधुनिक श्रेणी सादर केली आहे. या एअर प्युरिफायरच्या माध्यमातून लोकांना अशुद्ध होत असलेल्या हवेपासून वाचवणे हाच उद्देश याअंतर्गत कंपनीने ठेवला आहे. बॉलीवूड अभिनेत्री आणि केंटची ब्रँड अॅम्बेसेडर हेमा मालिनींनी या नव्या अभियानाची सुरुवात केली. केंट आरओ सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष डाॅ. महेश गुप्ता यांनी ही माहिती दिली.
एअर प्युरिफायरचे दोन मॉडेल
केंट आॅरा आणि केंट एटरनल सादर केले असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. ते हवेतील धोकादायक कणांना नष्ट करतात. एचईपीए फिल्टर्समध्ये पीएम २.५ पार्टिक्युलेट (९९.९९ %पर्यंत), पॉलेन, अॅलर्जिन, सर्फेस अॅधरिंग मोल्ड, महीन धुळीचे कण आणि दुर्गंधी म्हणजेच सिगारेटचा धूर, इंधन आणि पाळीव प्राण्यांच्या शरीरातून येणारा वास नष्ट करण्याची पूर्ण क्षमता आहे. ही इतर प्युरिफिकेशन तंत्रज्ञानाप्रमाणे नाही, ज्यामध्ये केमिकल आणि इतर प्लाझ्मा फॉर्म्ड बाय- प्रॉडक्ट्सचा वापर होतो.