आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा खरिपाची लागवड घटली, गेल्यावर्षीच्या तुलनेत 6 लाख हेक्टर कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -यंदाच्या खरीप हंगामात भात या पिकाची लागवड १.५४ टक्क्याने घटली आहे. आतापर्यंत देशभरात ३६६.३० लाख हेक्टर जमिनीवर भाताची लागवड करण्यात आली आहे. मागच्या वर्षी याच काळापर्यंत ३७२.०३ लाख हेक्टर जमिनीवर भाताची लागवड करण्यात आली होती. तथापि, तामिळनाडू आणि आसाममध्ये आगामी काही आठवड्यांत लागवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  लागवडीतील हा फरक घटण्याची शक्यता आहे. कारण या राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत लागवड होत राहते.   

कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले, देशभरातील खरीप पिकाची एकूण लागवडीची आकडेवारी आता १ हजार २८ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. मागच्या वर्षी याच काळात १ हजार ३४ हेक्टरवर लागवड झाली होती. भाताशिवाय अन्य कडधान्याच्या लागवडीचा पेराही यंदा घटल्याचे चित्र आहे. जूनमध्ये मान्सून येताच  खरिपाची लागवड सुरू होते आणि साधारण ऑक्टोबरपर्यंत पिके कापणीसाठी तयार होतात. सध्या खरिपाच्या हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.  
बातम्या आणखी आहेत...